शीना बोरा हत्येप्रकरणी ‘सीबीआय’च्या धाडी

By admin | Published: October 20, 2015 04:01 AM2015-10-20T04:01:03+5:302015-10-20T04:01:03+5:30

शीना बोरा हत्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी पीटर मुखर्जी आणि त्यांची आरोपी पत्नी इंद्राणी यांच्या देशभरातील पाच शहरांमधील दहा ठिकाणांवर धाडी घातल्या.

CBI arrests Sheena Bora murder case | शीना बोरा हत्येप्रकरणी ‘सीबीआय’च्या धाडी

शीना बोरा हत्येप्रकरणी ‘सीबीआय’च्या धाडी

Next

नवी दिल्ली : शीना बोरा हत्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी पीटर मुखर्जी आणि त्यांची आरोपी पत्नी इंद्राणी यांच्या देशभरातील पाच शहरांमधील दहा ठिकाणांवर धाडी घातल्या.
तपास संस्थेच्या पथकाने मुखर्जी दाम्पत्याच्या निवासस्थानांचीही झडती घेतली. यात मुंबई आणि गोवा येथील दोन परिसर, गुवाहाटीतील इंद्राणीचे माहेर, त्यांचा वाहनचालक श्यामवर पिंटूराम राय याचे मुंबई व छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथील निवासस्थान व संजीव खन्नाच्या कोलकात्यातील घराचा समावेश आहे. शीनाच्या हत्येनंतर रायगड जिल्ह्यातील जंगलात तिचा मृतदेह जाळण्यात आला होता. इंद्राणी, खन्ना व राय यांनी हत्येचा कट रचला होता. या तिघांच्या चौकशीतून काही विशिष्ट पुरावे मिळतात काय याचा शोध घेतला जात आहे. इंद्राणीच्या हत्येमागचा नेमका उद्देश काय? याचा छडाही सीबीआयला लावायचा आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: CBI arrests Sheena Bora murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.