CBI Busts Racket: '100 कोटींमध्ये राज्यपाल-राज्यसभेची जागा घ्या', CBIकडून टोळीचा भांडाफोड, 4 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 04:40 PM2022-07-25T16:40:57+5:302022-07-25T16:41:08+5:30

राज्यसभेची उमेदवारी आणि राज्यपालपद मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन 100 कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या आंतरराज्य टोळीचा केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पर्दाफाश केला आहे. यात लातूरच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

CBI Busts Racket:CBI busts racket promising governorship, Rajya Sabha seats for Rs 100 cr | CBI Busts Racket: '100 कोटींमध्ये राज्यपाल-राज्यसभेची जागा घ्या', CBIकडून टोळीचा भांडाफोड, 4 जणांना अटक

CBI Busts Racket: '100 कोटींमध्ये राज्यपाल-राज्यसभेची जागा घ्या', CBIकडून टोळीचा भांडाफोड, 4 जणांना अटक

googlenewsNext


CBI Busts Racket: राज्यसभेची उमेदवारी आणि राज्यपालपद मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन 100 कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या आंतरराज्य टोळीचा केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तपास यंत्रणेने अनेक ठिकाणी छापे टाकून टोळीतील चार जणांना अटक केली आहे. एक आरोपी सीबीआय अधिकाऱ्यांवर हल्ला करून पळून जाण्यात यशस्वी झाला. तपास संस्थेच्या अधिकार्‍यांवर हल्ला केल्याप्रकरणी फरार आरोपींविरुद्ध स्थानिक पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.


अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सीबीआयने एफआयआरमध्ये महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी कमलाकर प्रेमकुमार बंडगर, कर्नाटकच्या बेळगावचा रहिवासी रवींद्र विठ्ठल नाईक आणि दिल्लीचे रहिवासी महेंद्र पाल अरोरा, अभिषेक बुरा आणि मोहम्मद एजाज खान यांची नावे आहेत. एफआयआरमध्ये आरोप करण्यात आला आहे की, बंडगर हा सीबीआयचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगायचे आणि बुरा, अरोरा, खान आणि नाईक यांना लोकांची फसवणूक करुन मोठी कामे आणायला सांगायचा. 

एफआयआरमध्ये काय आहे?
एफआयआरनुसार, राज्यसभेत जागा मिळवून देणे, राज्यपालपदी नियुक्ती करणे, केंद्र सरकारच्या मंत्रालयांतर्गत विविध सरकारी संस्थांचे अध्यक्षपद मिळवून देणे, अशी खोटी आश्वासन देऊन ही टोळी सामान्य लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळायची. 100 कोटी रुपयांच्या बदल्यात राज्यसभेची उमेदवारी मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन लोकांची फसवणूक करण्यात आली. 

Web Title: CBI Busts Racket:CBI busts racket promising governorship, Rajya Sabha seats for Rs 100 cr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.