सीबीआय प्रमुख आरोपीच्या पिंज:यात

By admin | Published: September 3, 2014 02:31 AM2014-09-03T02:31:12+5:302014-09-03T02:31:12+5:30

सीबीआय प्रमुख म्हणून दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यास अवघे तीन महिने शिल्लक असताना रंजित सिन्हा वादात सापडले आहेत.

CBI chief's culprit: In this case | सीबीआय प्रमुख आरोपीच्या पिंज:यात

सीबीआय प्रमुख आरोपीच्या पिंज:यात

Next
हरीश गुप्ता - नवी दिल्ली
सीबीआय प्रमुख म्हणून दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यास अवघे तीन महिने शिल्लक असताना रंजित सिन्हा वादात सापडले आहेत. 
लक्ष्मी विलास पॅलेस विक्रीत कथित सहभाग प्रकरणी सीबीआयने निर्गुंतवणूक विभागाचे माजी सचिव प्रदीप बैजल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखला केला. त्यामुळे केंद्रीय अर्थ व संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी सीबीआयवर टीका केली असतानाच सर्वोच्च न्यायालयाने सिन्हा यांच्या निवासस्थानाला भेट देणा:यांची यादी तपासण्याला सहमती दर्शविली. सिन्हा यांच्या निवासस्थानी 2-जी आणि कोळसा घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू असलेल्यांपैकी काहींनी भेट दिल्याचा आरोप आहे.सर्वोच्च न्यायालयाने उचललेल्या अभूतपूर्व पावलांनी सिन्हा यांना जबरदस्त हादरा बसला आहे. 
सिन्हा यांचा प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्यातील बिनधास्तपणामुळे संपुआ-2 सरकारची गोची झाली होती. त्यांना ते सरकार रोखूशकले नव्हते. पण नवीन सरकार सत्तेत आल्यापासून सिन्हा प्रसिद्धी माध्यमांना फार उपलब्ध होत नाहीत.
 नवीन मुख्य दक्षता आयोगाच्या नियमानुसार सिन्हा यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ निश्चित झाला आहे. शिवाय काम देखील जवळजवळ स्वतंत्रपणो करण्याची मुभा मिळाली आहे. सीबीआयच्या चौकशीत सरकारचा हस्तक्षेप नाही. सीबीआय संचालकाचा निर्णय अंतिम असतो. त्यामुळे जेटली यांनी सार्वजनिकरीत्या केलेली टीका सीबीआयसाठी पहिला झटका होता. 
सीबीआयची अतिसक्रियता गुंतवणुकीच्या वातावरणासाठी वाईट असून नोकरशहांना निर्णय घेण्यापासून रोखणारी आहे, असे मोदी सरकारने स्पष्ट केले. 
एवढेच नव्हे तर लाचप्रकरणी सिंडीकेट बँकेच्याअध्यक्षांवरील धाड आणि भूषण स्टीलच्या व्यवस्थापकीय संचालकांना अटक झाल्यामुळे बँकर्समध्ये चिंतेचे वातावरण आहे. पण सरकारने यामुद्यांवर सीबीआयला बाजूला सारले. बैजल प्रकरणी तर रालोआ सरकारने सीबीआयला जवळजवळ लाथाडले आहे. सीबीआयने कोळसा घोटाळा प्रकरणी हिंदाल्को आणि माजी कोळसा सचिवांविरुद्ध प्रकरण मोडीत काढण्याचे निर्णय घेतल्यानंतर सरकारने ही भूमिका घेतली. सिन्हा यांनी स्वत:च्या निगराणीत बिर्ला यांच्यावरील धाड टाकली आणि एफआयआर दाखल केला होता. सहा महिन्यानंतर सीबीआयने हे प्रकरण मागे घेतले. 
 
च्सीबीआय प्रमुखांच्या घरच्या अभ्यागतांच्या नोंदीमध्ये स्फोटक माहिती असल्याचा आरोप प्रशांत भूषण यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात केला. न्यायालयाने या प्रकरणाची पडताळणी करण्याचे मान्य केले. 
च्सीबीआय तपास करीत असलेल्यांपैकी काहींनी सिन्हा यांची भेट घेतल्याचा आरोप प्रशांत भूषण केला.  सीबीआयने सिन्हा यांच्या घरीअशाप्रकारची कोणतीही ‘व्हिजिटर डायरी’ नसल्याचे म्हटले आहे. 
च्न्यायालयाने सीबीआयच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले आणि या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी करण्याचे निश्चित केले. 

 

Web Title: CBI chief's culprit: In this case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.