सीबीआय तोंडघशी : पालक निर्दोष, आरुषीची हत्या मग केली तरी कोणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:46 AM2017-10-13T00:46:35+5:302017-10-13T00:47:00+5:30

पुरावे देण्यात सीबीआयला अपयश आल्याने आरुषी हत्या प्रकरणातून अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिचे वडील डॉ. राजेश तलवार व आई नुपूर यांची पुराव्याअभावी सुटका केली.

 The CBI comes face to face: Parents kill innocent, but if Aarushi was killed? | सीबीआय तोंडघशी : पालक निर्दोष, आरुषीची हत्या मग केली तरी कोणी?

सीबीआय तोंडघशी : पालक निर्दोष, आरुषीची हत्या मग केली तरी कोणी?

Next

अलाहाबाद : पुरावे देण्यात सीबीआयला अपयश आल्याने आरुषी हत्या प्रकरणातून अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिचे वडील डॉ. राजेश तलवार व आई नुपूर यांची पुराव्याअभावी सुटका केली. आरुषी व घरातील नोकर यांचे मृतदेह १६ मे २00८ रोजी घरात आढळले होते. पालकांची सुटका झाल्याने आरुषी व नोकर हेमराज यांची हत्या कोणी केली, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दोघांच्या हत्येप्रकरणी गाझियाबाद सीबीआय न्यायालयाने राजेश व नुपूर यांना २६ आॅक्टोबर २0१३ रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासून हे दाम्पत्य गाझियाबादच्या दासना तुरुंगात होते. उच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे त्यांची शुक्रवारी सुटका होईल, अशी अपेक्षा आहे.
आरुषीचा मृतदेह १६ मे २00८ रोजी नॉयडातील घरात आढळला होता. तिची हत्या हेमराजने केल्याचा संशय घेतला गेला. पण दुसºया दिवशी घराच्या गच्चीवर हेमराजचा मृतदेह सापडल्याने तलवार दाम्पत्याकडे संशयाने पाहिले गेले. त्यांना अटकही करण्यात आली. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते. आता या निकालानंतर सीबीआयने आदेशाचा अभ्यास करून पुढे काय करायचे ठरवणार असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
आरुषीची हत्या झाली, तेव्हा ती अवघी १४ वर्षांची होती. तिचे व हेमराजचे संबंध होते, या संशयातून त्या दोघांची हत्या करण्यात आली आणि ती तलवार दाम्पत्यानेच केली, असे सांगण्यात येत होते. आता तलवार दाम्पत्याची निर्दोष सुटका झाल्यामुळे या हत्या कोणी केल्या, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. परिणामी या हत्येचे रहस्य कायमच आहे.
सीबीआय तपासाचा गोंधळ-
गाझियाबाद पोलिसांनी तपास नीट न केल्याची आणि त्यामुळे घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे नष्ट झाल्याची टीका झाल्यानंतर त्या वेळच्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी महिनाभरातच या खुनांचा तपास सीबीआयकडे सोपविला होता. सीबीआयनेही तपासात गोंधळ घातला.
तपास करणाºया पहिल्या तुकडीने ‘लाय डिटेक्टर’ आणि ‘नाकोॅ’ चाचण्यांनंतर तलवार दाम्पत्यासह त्यांच्या कम्पाउंडरला व इतर दोघांना अटक केली. परंतु नंतर या तपासी पथकाने अटक केलेल्या कोणाहीविरुद्ध पुरावा नसल्याचा अहवाल दिला. परंतु विशेष न्यायालयाने तो फेटाळला व आणखी तपास करण्याचा आदेश दिला.
दुसरे तपासी पथक नेमून पुन्हा तपास केला गेला. या पथकानेही तलवार दाम्पत्याविरुद्धचा पुरावा साशंक असल्याचे म्हटले. परंतु न्यायालयाने आहे त्या पुराव्यावर आरोपपत्र दाखल करण्यास सांगितले.
घटनेवर चित्रपट : हा खटला केवळ दिल्ली आणि परिसरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशात त्याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. या लोकभावना लक्षात घेऊनच या घटनाक्रमावर ‘तलवार’ नावाचा चित्रपट काढला गेला. मेघना गुलजार यांनी तो दिग्दर्शित केला होता.
आनंदाश्रू
आणि प्रार्थना
निकाल जाहीर करताच डॉ. राजेश तलवार यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले व त्यांनी आनंदाने सोबत आलेल्या तुरुंग कर्मचाºयांना मिठी मारली. त्यांची पत्नी डॉ. नुपूर यांनी आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या नाहीत. मात्र निकाल वाचला जाताना त्या हात जोडून प्रार्थना करत होत्या. या दोघांनी न्याय मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केल्याचे तुरुंग अधिकाºयांनी सांगितले.

Web Title:  The CBI comes face to face: Parents kill innocent, but if Aarushi was killed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.