अस्थानांनी केलेले भ्रष्टाचाराचे सर्व आरोप सीबीआय संचालक वर्मा यांनी फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 07:35 AM2018-11-10T07:35:39+5:302018-11-10T07:35:51+5:30

सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी केलेले भ्रष्टाचाराचे नऊ आरोप सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी फेटाळून लावले.

CBI director Verma rejects all corruption allegations made by the location | अस्थानांनी केलेले भ्रष्टाचाराचे सर्व आरोप सीबीआय संचालक वर्मा यांनी फेटाळले

अस्थानांनी केलेले भ्रष्टाचाराचे सर्व आरोप सीबीआय संचालक वर्मा यांनी फेटाळले

Next

- हरीश गुप्ता
नवी दिल्ली - सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी केलेले भ्रष्टाचाराचे नऊ आरोप सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी फेटाळून लावले. तरीही त्यातील दोन गंभीर आरोपांवर केंद्रीय दक्षता आयोगाच्या समितीने चौकशीमध्ये विशेष लक्ष केंद्रित केले आहे. चौकशी प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सर्व आरोपांना वर्मा यांनी आयोगासमोर मुद्देसूद उत्तरे दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवृत्त न्यायाधीश ए. के. पटनायक यांच्या नेतृत्वाखालील समिती या प्रकरणाची चौकशी १२ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीमध्येही हे कामकाज सुरू ठेवण्यात आले. गुरुवारी व शुक्रवारी असे सलग दोन दिवस दक्षता आयोगाच्या समितीसमोर ते हजर झाले.
या प्रकरणी सीबीआयमधील काही निरीक्षकस्तरीय अधिकाºयांची याआधीच चौकशी केली आहे. अस्थाना यांनी केलेल्या आरोपांच्या मुळाशी जाण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे.

दोन गंभीर आरोपांवर विशेष लक्ष

दक्षता आयोगातील सूत्रांनी सांगितले की, अस्थाना यांनी २४ आॅगस्ट रोजी कॅबिनेट सचिवांना लिहिलेल्या पत्रात वर्मांवर नऊ आरोप केले होते. त्यातील दोन आरोप गंभीर असून त्यावर लक्ष देण्यात येत आहे. हैदराबादचे उद्योजक सतीशबाबू सानाने वर्मा यांना २ कोटींची लाच दिली होती. ही बाब सानाने जबाबात मान्य केली आहे, असा आरोप अस्थाना यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास जरा सावकाश करा, असे आपल्याला वर्मा यांनी सांगितल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

लालू यादव रेल्वेमंत्री असताना पाटणा येथील भूखंड प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात त्यांचे कुटुंबीय गुंतले असल्याचा आरोप आहे. या प्रकरणातून एका रेल्वे अधिकाºयासह काही आरोपींची नावे वगळण्याची सूचना वर्मा यांनी केली होती, असा दावाही अस्थानांंनी केला.

Web Title: CBI director Verma rejects all corruption allegations made by the location

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.