सीबीआयने एफआयआर दाखल करावा : भाजपा
By admin | Published: April 28, 2016 01:54 AM2016-04-28T01:54:09+5:302016-04-28T01:54:09+5:30
एअरसेल-मॅक्सिसप्रकरणी दोषी असलेल्या लोकांना शिक्षा व्हावी यासाठी सीबीआयने लवकरात लवकर एफआयआर दाखल करावा,
नवी दिल्ली : एअरसेल-मॅक्सिसप्रकरणी दोषी असलेल्या लोकांना शिक्षा व्हावी यासाठी सीबीआयने लवकरात लवकर एफआयआर दाखल करावा, अशी मागणी करून भाजपाने बुधवारी लोकसभेत माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांना लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न केला.
भाजपाचे सदस्य निशिकांत दुबे यांनी शून्य तासादरम्यान हा मुद्दा उपस्थित केला. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) एअरसेल-मॅक्सिस घोटाळ्याशी संबंधित कं पन्यांवर छापे घातल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. माजी वित्तमंत्र्यांच्या नातीला मोठा लाभ झाल्याचे या छाप्यातून उघड झाले आहे. माजी वित्तमंत्र्यांचा पुत्र विदेशात संपत्ती असलेल्या काही कंपन्यांचा मालक बनलेला आहे, असे दुबे म्हणाले. दुबे यांच्या या आरोपावर काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि के. सी. वेणुगोपाल यांच्यासह अन्य सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. (वृत्तसंस्था)