NEET चे पेपर चोरून लीक करणाऱ्याला CBIने ठोकल्या बेड्या, कधी आणि कसे फोडले पेपर? आलं समोर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 05:17 PM2024-07-16T17:17:16+5:302024-07-16T17:21:15+5:30

NEET Exam Paper Leak: नीट पेपर लीक प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. नीट परीक्षेचे पेपर चोरून ते लीक करणाऱ्या आरोपीला पाटना येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याच्यासोबत त्याच्या एका सहकाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे.

CBI handcuffed the person who stole and leaked NEET papers, when and how did they crack the papers? Ginger in front    | NEET चे पेपर चोरून लीक करणाऱ्याला CBIने ठोकल्या बेड्या, कधी आणि कसे फोडले पेपर? आलं समोर 

NEET चे पेपर चोरून लीक करणाऱ्याला CBIने ठोकल्या बेड्या, कधी आणि कसे फोडले पेपर? आलं समोर 

नीट पेपर लीक प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. नीट परीक्षेचे पेपर चोरून ते लीक करणाऱ्या आरोपीला पाटना येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याच्यासोबत त्याच्या एका सहकाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. सीबीआयने ही अटकेची करावाई केली आहे. ज्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यांची नावं पंकज कुमार आणि राजू सिंह अशी असल्याचं समोर आलं आहे.

याबाबत सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार पंकज कुमार उर्फ आदित्य याने ज्या ट्रंकमधून पेपर जात होता. त्यामधूनच तो चोरला होता. तसेच तो पुढे लीक करण्यासाठी दिला होता. पंकज कुमार याचं शिक्षण जमशेदपूर येथे झालं असून, तो बोकारो येथील रहिवासी आहे. सीबीआयने पाटना येथून त्याला अटक केली.  तर त्याचा एक अन्य सहकारी राजू सिंह याला हजारीबाग येथून बेड्या ठोकल्या.  

मिळालेल्या माहितीनुसार पंकज कुमार याने स्टील बॉक्समधून पेपर चोरले होते. तसेच पंकजने पेपर चोरल्यानंतर दुसऱ्या आरोपीने ते लीक करण्यामध्ये मदत केली होती.  एनटीएकडून पेपर पाठवण्यात आल्यानंतर पंकज कुमार याने हे पेपर स्टील बॉक्स म्हणजेच ट्रंकामधून लीक केले. या कामात राजू कुमारने त्याला मदत केली. तसेच तसेच पेपर लीक केल्यानंतर तो जिथे जिथे पोहोचवायचा होता तिथे पोहोचवण्यात आला. पंकज कुमारकडे इंजिरियरिंगची पदवीसुद्धा आहे.  

Web Title: CBI handcuffed the person who stole and leaked NEET papers, when and how did they crack the papers? Ginger in front   

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.