भ्रष्टाचार खटल्यांत ‘सीबीआय’ ठरली यशाएवढीच अपयशीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 03:52 AM2017-12-28T03:52:17+5:302017-12-28T03:52:25+5:30

नवी दिल्ली : भ्रष्टाचारमुक्तीचा नारा देऊन नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या चार वर्षांत केंद्राच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय गुप्तचर संस्थेला (सीबीआय) भ्रष्टाचार खटल्यांमध्ये जवळजवळ समान यश व अपयश आल्याचे दिसते.

The CBI has failed in the corruption case | भ्रष्टाचार खटल्यांत ‘सीबीआय’ ठरली यशाएवढीच अपयशीही

भ्रष्टाचार खटल्यांत ‘सीबीआय’ ठरली यशाएवढीच अपयशीही

Next

नवी दिल्ली : भ्रष्टाचारमुक्तीचा नारा देऊन नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या चार वर्षांत केंद्राच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय गुप्तचर संस्थेला (सीबीआय) भ्रष्टाचार खटल्यांमध्ये जवळजवळ समान यश व अपयश आल्याचे दिसते. केंद्रीय कर्मचाºयांविरुद्धचे खटले फक्त ‘सीबीआय’ हाताळत असते, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी बुधवारी लोकसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार वर्षांत ‘सीबीआय’ने दाखल केलेल्या भ्रष्टाचार खटल्यांमध्ये ३,६१७ आरोपींना न्यायालयांनी दोषी ठरवून शिक्षा दिल्या. तर ३,२०० आरोपींना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले गेले. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोषसिद्धीचा वार्षिक आकडेवारी अशी: वर्ष २०१४- ५०९ खटल्यांत ९९३ आरोपी दोषी. सन २०१५- ४३४ खटल्यांत ८७८ दोषी. वर्ष २०१६ मध्ये ५०३ खटल्यांत १,००५ आरोपी दोषी व यंदा नोव्हेंबर अखेरपर्यंत ७४१ आरोपी दोषी. सीबीआयने केलेल्या तपासात केंद्र सरकार हस्तक्षेप करत नाही.
ज्यात आरोपी निर्दोष सुटतात अशा प्रकरणांच्या निकालांची छाननी करून अपिलाबाबत निर्णय घेण्याची सीबीआयची सुप्रस्थापित अशी अंतर्गत व्यवस्था आहे. त्यानुसार निर्णय घेतले जातात, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.
>जबाबदारी निश्चिती
आरोपी निर्दोष सुटण्यास तपासातील त्रुटी कारणीभूत आहेत की अभियोग चालविण्यातील यादृष्टीनेही निकालपत्रांचा अभ्यास केला जातो व अ‍ॅटर्नी जनरल वा त्यांच्या प्रतिनिधींच्या सल्ल्याने जबाबदारी निश्चित केली जाते, असेही मंत्र्यांनी सांगितले.
>आरोप सिद्ध
करण्यात अपयश
वर्ष खटले
२०१४ ७४८
२०१५ ८२१
२०१६ ९४४
२०१७* ७५५
(*नोव्हेंबर अखेरपर्यंत)

Web Title: The CBI has failed in the corruption case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.