न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 08:37 PM2018-02-09T20:37:39+5:302018-02-09T20:40:31+5:30
सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच.लोया यांच्या चार वर्षांपूर्वी नागपूर येथे झालेल्या संश्यास्पद मृत्यूचं प्रकरण सध्या देशभरात चर्चेत आहे.
नवी दिल्ली : सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच.लोया यांच्या चार वर्षांपूर्वी नागपूर येथे झालेल्या संश्यास्पद मृत्यूचं प्रकरण सध्या देशभरात चर्चेत आहे. न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी व्हावी, यासाठी सुप्रीम कोर्टाच्या नेतृत्वात विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आज अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांनी केली. कॉंग्रेससह 13 विरोधी पक्षातील नेत्यांनी शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन पत्राद्वारे ही मागणी केली.
''हे गंभीर प्रकरण आहे, न्या. लोया यांचा मृत्यू हा संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे, देशभरात या प्रकरणाची चर्चा झाली आहे. या चौकशीसाठी 15 राजकीय पक्षांच्या 114 खासदारांनी एका अर्जावर सह्या केल्या आहेत. प्रकरण गंभीर आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण या प्रकरणाची स्वतंत्र चौकशीची मागणी करीत आहोत''', अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या भेटीनंतर दिली.
यापूर्वी न्या. लोया मृत्यू प्रकरणाच्या सुनावणीवेळी म्हणजे दि.5 रोजी सुप्रीम कोर्टातील वातावरण सध्या प्रचंड तापले होते. न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याप्रकरणात बाजू मांडणाऱ्या दोन वरिष्ठ वकिलांना फटकारले होते. न्यायालयाला मासळी बाजाराच्या पातळीला आणून ठेवू नका, अशा शब्दांत न्यायमूर्तींनी वकिलांना समज दिली होती. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.
Many MPs from both Lok Sabha & Rajya Sabha felt discomfort over it & also feel that the matter should be probed & an SIT should be formed: Rahul Gandhi after opposition delegation met President over #JudgeLoya death case pic.twitter.com/IeOQhxPrdC
— ANI (@ANI) February 9, 2018