मुख्यमंत्री रावत यांना सीबीआयची नोटीस!

By admin | Published: December 24, 2016 01:37 AM2016-12-24T01:37:02+5:302016-12-24T01:37:02+5:30

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना कथित लाच देऊ केल्याच्या प्रकरणात केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) उत्तराखंडचे

CBI notice to Chief Minister Rawat | मुख्यमंत्री रावत यांना सीबीआयची नोटीस!

मुख्यमंत्री रावत यांना सीबीआयची नोटीस!

Next

नवी दिल्ली : काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना कथित लाच देऊ केल्याच्या प्रकरणात केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांना २६ डिसेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. राज्य विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी मला पाठिंबा द्यावा यासाठी रावत यांनी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना यावर्षी २९ एप्रिल रोजी लाच
देऊ केली होती व त्याचे स्टींग आॅपरेशन करण्यात आले होते. याच आरोपावरून रावत यांची सीबीआयने प्राथमिक चौकशी केली असून २४ मे रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. जवळपास पाच तास त्यांची चौकशी झाली.

Web Title: CBI notice to Chief Minister Rawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.