CBI अधिकारी कौतुकास पात्र; मोदींकडून तीन नवीन कार्यालयांचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 01:07 PM2023-04-03T13:07:31+5:302023-04-03T13:30:31+5:30
राजधानी दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते सीबीआयच्या डायमंड ज्युबिली कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले
देशात मोदी सरकारच्या काळात ईडी आणि सीबीआय विभागाची चांगलीच दहशत निर्माण झालीय. गैरमार्गाने पैसा कमावणाऱ्यावर सध्या देशभरात कारवाई सुरू असून राजकीय नेते, उद्योजक आणि इतर क्षेत्रातील श्रीमंत लोकांच्या कार्यालयांवर ईडी व सीबीआयच्या धाडी पडत आगहेत. आजच ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाकडून पुण्यात पुन्हा एकदा छापेमारी केली. ईडीच्या पथकाने पुण्यातील व्यावसायिकांच्या घर कार्यालय अशा 9 ठिकाणी छापे टाकले. एकीकडे ईडीचे छापे पडले असतानाच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते पुण्यात नवीन सीबीआय कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे.
राजधानी दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते सीबीआयच्या डायमंड ज्युबिली कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच, शिलाँग, पुणे आणि नागपूर येथील सीबीआयच्या नवीन कार्यालयाचेही उद्घाटन मोदींच्याहस्ते झाले. नव्याने उद्घाटन झालेल्या कार्यालयातून सीबीआयला कार्यप्रणाली जोरकसपणे राबविण्यास मदत होईल. देशात सीबीआय तपासाच्या मागणीसाठी आंदोलन देखील केले जाते. न्याय, इंसाफचं ब्रँडनेम म्हणून सीबीआयकडे पाहिलं जातं. त्यामुळेच, सीबीआयमध्ये ज्यांनी काम केलंय, ते सर्वचजण कौतुकास पात्र आहेत, असे मोदींनी या कार्यक्रमात बोलताना म्हटले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने केंद्रीय जांच ब्यूरो (CBI) के डायमंड जुबली समारोह का उद्घाटन किया और शिलांग, पुणे और नागपुर में CBI के नवनिर्मित कार्यालय परिसरों का उद्घाटन किया। pic.twitter.com/9FCwD5weUX
— ANI_HindiNews (@AHindinews) April 3, 2023
पुण्यात ईडीची कारवाई
मुंबईतील ईडीच्या पथकाने सोमवारी पहाटेपासूनच व्यावसायिक विवेक गव्हाणे, सनदी लेखापाल जयेश दुधडिया आणि ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांची कार्यालय आणि निवासस्थानावर छापे टाकले. पुणे शहरातील हडपसर, गणेश पेठ, प्रभात रस्ता आणि सिंहगड रस्ता परिसरात ही छापेमारी करण्यात आली.