''सीबीआय तोता है'', विरोधकांच्या घोषणेनंतर राजनाथ सिंह म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 01:21 PM2019-02-04T13:21:36+5:302019-02-04T13:21:47+5:30
ममता बॅनर्जी आणि सीबीआयच्या आडून केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या वादावरून लोकसभेतही रणकंदन झालं आहे.
नवी दिल्ली- ममता बॅनर्जी आणि सीबीआयच्या आडून केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या वादावरून लोकसभेतही रणकंदन झालं आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन दिलं. राजनाथ सिंह निवेदन देत असताना तृणमूलच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. सीबीआय तोता है, तृणमूलच्या खासदारांची घोषणाबाजी देत सभागृह दणाणून सोडला. त्यादरम्यान राजनाथ सिंह यांनी भाषण दिलं आहे. कायद्याच्या संस्थांना अटकाव करणं देशहितासाठी योग्य नाही. संस्थांना काम करण्यापासून रोखल्यास व्यवस्थेचे तीन-तेरा वाजतील. केंद्रानं नेहमीच राज्यांच्या अधिकारांचा सन्मान केला आहे.
पोलीस हे राज्यांतर्गत येतात. राज्यांनीही केंद्र सरकारच्या संस्थांचा सन्मान केला पाहिजे. कालची घटना ही संवैधानिक मूल्यांना पायदळी तुडवण्यासारखी आहे. राज्यपालांशी माझं बोलणं झालं असून, मी त्यांच्याकडून एक रिपोर्ट मागितला आहे. मुख्यमंत्र्यांनी सरकारी संस्थांना काम करण्यापासून रोखू नये, असंही राजनाथ सिंह म्हणाले आहेत.
HM Rajnath Singh in Lok Sabha: West Bengal Governor Keshari Nath Tripathi has summoned Chief Secretary and Director General of Police and has asked them to take immediate action to resolve the situation. pic.twitter.com/RK3euu7OSE
— ANI (@ANI) February 4, 2019
लोकसभेत राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, कोलकात्यात सीबीआय अधिकाऱ्यांना त्यांचं काम करण्यापासून रोखण्यात आलं. अशी घटना देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाली आहे. चिटफंड घोटाळ्यातील आरोपींना राजकीय संरक्षण दिलं जातंय.
HM Singh on the CBI action in Saradha chit fund case in West Bengal yesterday: The action was taken after SC had ordered an investigation into Saradha chit fund case . The Police Commissioner was summoned many times but he did not appear. pic.twitter.com/pM4vXdvExN
— ANI (@ANI) February 4, 2019
सीबीआय या प्रकरणात तपास करत आहे. त्यामुळेच सीबीआयला आयुक्तांच्या घरी जावे लागले. या घोटाळ्यात नावाजलेल्या आणि राजकीय लोकांचा समावेश आहे. राजनाथ सिंह भाषण करत असतानाच तृणमूलच्या खासदारांनी मोठा गदारोळ केला. तृणमूल खासदारांच्या गदारोळानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं आहे.