माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या साथीदाराच्या घरावर सीबीआयचा छापा! विमा घोटाळ्याची चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 11:28 AM2023-05-17T11:28:47+5:302023-05-17T11:29:42+5:30
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या साथीदाराच्या घरावर सीबीआयने छापा टाकला .
सीबीआयने जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या एका साथीदाराच्या घरावर छापा टाकला आहे. कथित विमा घोटाळ्यातील सत्यपाल मलिक यांच्या साथीदाराच्या घरावर सीबीआयने झडती घेतली. तपास यंत्रणेने दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये आठ ठिकाणी कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या पथकाने सत्यपाल मलिक यांच्या माजी सहाय्यकाच्या निवासस्थानी आणि इतर ठिकाणी शोधमोहीम सुरू केली.
मंदिराला बनवलं स्टडी कॉर्नर, यूट्यूबवरुन केला अभ्यास; कोचिंगशिवाय रेल्वेत मिळाल्या 2 नोकऱ्या
२८ एप्रिल रोजी तपास यंत्रणेने सत्यपाल मलिक यांची विमा घोटाळ्याबाबत चौकशी केली होती. मलिक यांच्या निवासस्थानी ही चौकशी करण्यात आली. बिहार, जम्मू आणि काश्मीर, गोवा आणि मेघालयचे राज्यपाल म्हणून निवृत्त झाल्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सीबीआयने अगोदर त्यांचा जबाब नोंदवले होते.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी समूह वैद्यकीय विमा योजना आणि जम्मू-काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पासाठी कंत्राट देण्यासाठी सत्यपाल मलिक यांना लाच देण्यात आल्याचा आरोप केला होता. मलिक यांच्या आरोपानंतर सीबीआयने दोन एफआयआर नोंदवले आहेत.
२३ ऑगस्ट २०१८ ते ३० ऑक्टोबर २०१९ दरम्यान जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असताना दोन फायली निकाली काढण्यासाठी त्यांना ३०० कोटी रुपयांची लाच देऊ केल्याचा दावा माजी राज्यपालांनी केला होता.