कर्जथकबाकीप्रकरणी विजय मल्ल्यांचे घर, ऑफीसवर सीबीआयचा छापा
By admin | Published: October 10, 2015 05:06 PM2015-10-10T17:06:47+5:302015-10-10T19:43:33+5:30
आयडीबीआय बँकेकडून घेतलेल्या ९५० कोटी रुपयांच्या थकबाकीप्रकरणी विजय मल्ल्या यांचे निवासस्थान व कार्यालयांवर सीबीआयने शनिवारी छापे मारले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्ल्या यांचे निवासस्थान व कार्यालयांवर सीबीआयने शनिवारी छापे मारले. किंगफिशर एअरलाइन्सने आयडीबीआय बँकेकडून घेतलेल्या ९५० कोटी रुपयांच्या थकबाकीप्रकरणाच्या संदर्भात सीबीआयने हे छापे मारल्याचे समजते. कंपनीचे क्रेडिट रँकिंग निगेटिव्ह असतानाही कंपनीला हे कर्ज देण्यात आल्याने संशय निर्माण झाला आहे.
मल्ल्यांच्या मुंबई, गोवा, बंगळुरूसह अन्य ठिकाणची निवासस्थानी व कार्यालयांवर छापे मारण्यात आल्याचे सीबीआयच्या अधिका-यांनी सांगितले. याप्रकरणी लवकरच विजय मल्ल्या यांची चौकशी होऊ शकते.
बँकेच्या कर्जथकबाकीप्रकरणी सुरूवातील करण्यात आलेल्या तपासादरम्यान सीबीआय अधिका-यांनी किंगफिशर एअरलाइन्स व बँकेच्या काही अधिका-यांची चौकशी केली होती. कंपनीला असलेले निगेटिव्ह क्रेडिट रेटिंग आणि बँकेने कंपनीला कर्ज देऊ नये हे सांगणारा अंतर्गत अहवाल नजरेआड करून बँकेने कंपनीला कर्ज का दिले, याची चौकशी अधिका-यांकडे करण्यात आली.