NDTV चे प्रमोटर प्रणय रॉय यांच्या घरावर सीबीआयचा छापा

By admin | Published: June 5, 2017 12:21 PM2017-06-05T12:21:51+5:302017-06-05T13:54:56+5:30

वृत्तवाहिनी एनडीटीव्हीचे सहसंस्थापक आणि सीईओ प्रणय रॉय यांच्या घरावर आज सकाळी सीबीआयने छापेमारी केली

CBI raids at NDTV promoter Pranay Roy's house | NDTV चे प्रमोटर प्रणय रॉय यांच्या घरावर सीबीआयचा छापा

NDTV चे प्रमोटर प्रणय रॉय यांच्या घरावर सीबीआयचा छापा

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - वृत्तवाहिनी एनडीटीव्हीचे सहसंस्थापक आणि सीईओ प्रणय रॉय यांच्या घरांवर आज सकाळी सीबीआयने छापा टाकले. प्रणय रॉय यांच्यावर निधीमध्ये फेरफार आणि बँकेचं नुकसान केल्याचा आरोप आहे. दिल्ली आणि देहराडूनमधील चार ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले. प्रणय रॉय यांच्यावर आयसीआयसीआय बँकेचं 48 कोटी रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप आहे.
 
सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयचं एक पथक एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे सहसंस्थापक आणि सीईओ प्रणय रॉय यांच्या ग्रेटल कैलाश-1 येथील घरी पोहोचली आणि छापा टाकला. सीबीआयने रविवारी उशिरा प्रणय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापा मारला. प्रणय रॉय यांच्यावर निधीमध्ये फेरफार आणि बँकेचं नुकसान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयने गुन्हाही दाखल केला आहे.
 
सीबीआयचं एक पथक प्रणय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका यांच्याकडे बँक घोटाळाप्रकरणी चौकशी करत आहेत. सीबीआयच्या माहितीनुसार, दिल्लीव्यतिरिक्त देहाराडूनमध्येही छापे टाकण्यात आले. याआधी अंमलबजावणी संचलनालयाने फेमा कायद्याचं उल्लंघन केल्यानंतर एनडीटीव्हीविरोधात 2030 कोटी रुपयांची नोटीस जारी केली होती. ईडीने ही नोटीस प्रणय रॉय, राधिका रॉय आणि वरिष्ठ कार्यकारी केव्हीएल नारायण राव यांच्याविरोधात जारी केली होती.
 
यासंबंधी भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केलं आहे. एनडीटीव्ही प्रणव रॉय आणि त्यांची पत्नी राधिका यांना अटक करु नये यासाठी सरकारला विनंती करत आहे असा दावा त्यांनी ट्विटमधून केला आहे. तसंच प्रत्येकाला कायद्याची भीती हवी. मग तो कितीही मोठा व्यक्ती का असेना असंही ते बोलले आहेत. 
 
दरम्यान एनडीटीव्हीनेही यासंबंधी आपली बाजू मांडत स्टेटमेंट जारी केलं आहे. यामध्ये आम्ही लढा देऊन विजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
 

Web Title: CBI raids at NDTV promoter Pranay Roy's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.