आपचे आमदार व अन्य लोकांशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयच्या धाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 08:24 AM2024-03-24T08:24:43+5:302024-03-24T08:24:55+5:30
गुलाबसिंह यादव हे दिल्लीतील मटियाला विधानसभा मतदारसंघातून दोनदा आमदारपदी निवडून आले आहेत.
नवी दिल्ली : कर चुकवेगिरीच्या प्रकरणात सीबीआयने आपचे दिल्लीतील आमदार गुलाबसिंह यादव व आणखी काही जणांशी संबंधित ठिकाणांवर शनिवारी धाडी घातल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. गुलाबसिंह यादव हे दिल्लीतील मटियाला विधानसभा मतदारसंघातून दोनदा आमदारपदी निवडून आले आहेत.
दिल्ली परिसरातील घुमानखेडा गावामध्ये असलेले यादव यांचे निवासस्थान व अन्य काही जणांशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयने धाड टाकली. त्यावेळी दिल्ली पोलिसांचे पथक संरक्षणासाठी तैनात करण्यात आले होते.
या ठिकाणांहून काही कागदपत्रे सीबीआयने ताब्यात घेतली. तसेच, काही व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे. मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी अटक केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी सीबीआयने या पक्षाशी संबंधित लोकांवर कर चुकवेगिरीप्रकरणी कारवाईचा बडगा उगारला.