महुआ मोईत्रा यांच्याशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयचे छापे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 06:47 IST2024-03-24T05:39:57+5:302024-03-24T06:47:49+5:30
महुआ मोईत्रा यांचे कोलकाता येथील निवासस्थान, नादिया जिल्ह्यातील त्यांचे आणखी एक निवासस्थान यावर सीबीआयने धाडी टाकल्या.

महुआ मोईत्रा यांच्याशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयचे छापे
कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर सीबीआयच्या पथकांनी शनिवारी धाडी टाकल्या. कोलकातामध्येदेखील ही कारवाई करण्यात आली.
महुआ मोईत्रा यांचे कोलकाता येथील निवासस्थान, नादिया जिल्ह्यातील त्यांचे आणखी एक निवासस्थान यावर सीबीआयने धाडी टाकल्या. महुआ या कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातील खासदार होत्या. त्यांचे वडील दीपेंद्रलाल कोलकातातील अलिपूर भागात राहत असून, तेथे सीबीआयने धाड टाकली. या सर्व ठिकाणी सीबीआयने दिवसभर तपासणी केली.