IRCTC टेंडर घोटाळ्याप्रकरणी राबडी देवींच्या घरावर सीबीआयचे छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 04:58 PM2018-04-10T16:58:37+5:302018-04-10T16:58:37+5:30
रेल्वे हॉटेल टेंडर प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानावर सीबीआयने मंगळवारी छापा टाकला.
पाटना : रेल्वे हॉटेल टेंडर प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानावर सीबीआयने मंगळवारी छापा टाकला. यावेळी राबडी देवी यांच्यासह त्यांचा मुलगा आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची सुद्धा सीबीआयने जवळपास चार तास चौकशी केली.
रेल्वे हॉटेल टेंडर प्रकरणी गेल्या वर्षी जुलै महिन्यात पहिल्यांदाच सीबीआयने लालू प्रसाद यादव यांच्या घरी छापेमारी केली होती. त्यानंतर आता पाटनामधील 10 सर्कुलर रोडवरील राबडी देवींच्या घरावर सीबीआयने छापा टाकला. यावेळी त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांची सुद्धा चौकशी केली. ही चौकशी जवळपास चार तास चालली. यावेळी सीबीआयचे 12 हून अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. दरम्यान, याप्रकरणी लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अनेक ठिकाणांवर यापूर्वीही छापेमारी करण्यात आली आहे.
#Visuals CBI searches at Rabri Devi's Patna residence conclude, son Tejashwi Yadav questioned for over 4 hours in connection railway hotel tender case. pic.twitter.com/gp38UJlihX
— ANI (@ANI) April 10, 2018
लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना रांची आणि पुरी येथील हॉटेलच्या निविदावाटपात गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. लालूंसोबत पत्नी राबडीदेवी, मुलगा तेजस्वी यादव आणि आयआरसीटीसीचे माजी व्यवस्थापकीय संचालकांसह आणखी आठ जणांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रांची आणि पुरीमध्ये रेल्वे खात्याअंतर्गत येणाऱ्या हॉटेलांचा विकास आणि देखरेखीसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यावेळी एका खासगी कंपनीला फायदा करून दिल्याचा आरोप लालू प्रसाद यादव यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
#UPDATE: CBI searches at Rabri Devi's Patna residence conclude, son Tejashwi Yadav questioned for over 4 hours in connection railway hotel tender case.
— ANI (@ANI) April 10, 2018