भलेभले नाव ऐकताच कापतात, त्या CBI मध्ये नोकरीची संधी; फक्त एकच अट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 20:08 IST2020-07-08T20:08:08+5:302020-07-08T20:08:49+5:30
CBI द्वारे जारी करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या उमेदवारांना न्यायालयात सुरु असलेल्या प्रकरणांच्या तपासासाठी नियुक्त केले जाणार आहे.

भलेभले नाव ऐकताच कापतात, त्या CBI मध्ये नोकरीची संधी; फक्त एकच अट
CBI Recruitment 2020: केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) मध्ये नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यासाठी चांगली बातमी आहे. CBI ने रिक्त जागांसाठी अर्ज मागविले आहे. या भरतीअंतर्गत सल्लागारच्या पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. योग्य आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी 15 जुलै पर्यंत अर्ज करू शकतात.
CBI द्वारे जारी करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या उमेदवारांना न्यायालयात सुरु असलेल्या प्रकरणांच्या तपासासाठी नियुक्त केले जाणार आहे. या भरतीमध्ये निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर किंवा त्यावरील अधिकारी अर्ज करू शकणार आहेत. निवड झाल्यानंतर या पदासाठी 40000 रुपयांचा पगार दिला जाणार आहे.
या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे केंद्र किंवा राज्य पोलीस दलामध्ये कमीतकमी 10 वर्षांचा तपासाच अनुभव असावा अशी महत्वाची अट ठेवण्यात आली आहे. तसेच उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असला पाहीजे. सीबीआयमध्ये नोकरी स्वीकारल्यानंतर उमेदवार कुठेही पार्ट टाईम जॉब करू शकणार नाही. कामाचे ठिकाण हैदराबाद असणार आहे.
उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार CBI च्या अधिकृत वेबसाईट www.cbi.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
SBI देखील भरती करणार...
भारतीय स्टेट बँकेने पुढील 6 महिन्यांमध्ये 2000 कनिष्ठ आणि मध्यम श्रेणीच्या एक्झिक्युटीव्हची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या या योजनेविषयी माहिती असणाऱ्या दोन लोकांनी सांगितले की, ग्रामीण भागामध्ये चांगला विकास होण्यासाठी आणि बँकेच्या व्यवसाय वाढीसाठी ही भरती करण्यात येणार आहे. बँक ग्राहकांकडून ज्या सेवांसाठी पैसे आकारते त्या सेवांचा विस्तार ग्रामीण भागामध्ये करण्यात येणार आहे. कोरोनामुळे बँकेचे उत्पन्न घटले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
महा मेट्रोमध्येही संधी
मुंबई मेट्रोपोलिटन रीजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (MMRDA) ने मुंबई मेट्रोच्या वेगवेगळ्या पदांवर भरती आयोजित केली आहे. यासाठी अधिकृत वेबसाईट mmrda.maharashtra.gov.in वर नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नोकरी विषयक आणि फायद्याच्या अन्य बातम्या...
मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी सुवर्णसंधी; पगार 1.22 लाखापर्यंत
सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी सोडू नका; 1850 जागांवर भरती
लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज
गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार
FD पेक्षाही जास्त व्याज देणार; केंद्र सरकारची 'अफलातून' योजना लाँच