CBI ने सिसोदियांना चौकशीसाठी बोलावले; केजरीवाल म्हणाले- 'ते आजचे भगत सिंग...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 01:29 PM2022-10-16T13:29:47+5:302022-10-16T13:31:23+5:30

सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना उद्या सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे.

CBI summons Manish Sisodia for questioning; Arvind Kejriwal said- 'He is today's Bhagat Singh' | CBI ने सिसोदियांना चौकशीसाठी बोलावले; केजरीवाल म्हणाले- 'ते आजचे भगत सिंग...'

CBI ने सिसोदियांना चौकशीसाठी बोलावले; केजरीवाल म्हणाले- 'ते आजचे भगत सिंग...'

googlenewsNext

नवी दिल्ली: सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अबकारी घोटाळ्याप्रकरणी उद्या सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान, सीबीआयला तपासात संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सिसोदिया म्हणाले. तसेच, अरविंद केजरीवालांनी सिसोदियांना शहीद भगत सिंग यांची उपमा दिली. याआधी, अंमलबजावणी संचालनालयाने उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्यासंदर्भात शुक्रवारी दिल्लीत 25 ठिकाणी छापे टा

मनीष सिसोदिया काय म्हणाले?
सीबीआय कारवाईच्या पार्श्वभूमीवर सिसोदियांनी ट्विट केले की, 'माझ्या घरावर 14 तास सीबीआयने छापे टाकले, काहीही निष्पन्न झाले नाही. माझ्या बँक लॉकरची झडती घेतली, त्यातही काहीही निष्पन्न झाले नाही. माझ्या गावात यांना काही सापडले नाही. आता यांनी उद्या सकाळी 11 वाजता मला मुख्यालयात बोलावले आहे. मी जाईन आणि तपासात पूर्ण सहकार्य करेन.'कले होते.

अरविंद केजरीवालांचे ट्विट


यातच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत मनीष सिसोदिया यांना भगत सिंग म्हटले. ते म्हणतात की, 'तुरुंग आणि फाशी भगतसिंग यांना रोखू शकली नाही. हा स्वातंत्र्याचा दुसरा लढा आहे. मनीष आणि सत्येंद्र आजचे भगतसिंग आहेत. 75 वर्षांनंतर गरीबांना चांगले शिक्षण देणारा आणि उज्ज्वल भविष्याची आशा देणारा शिक्षणमंत्री देशाला मिळाला. करोडो गरिबांच्या प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत.'

काय आहे वाद?
उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिल्लीतील नवीन उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. त्याचबरोबर 11 उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. तेव्हापासून हे मद्य धोरण सीबीआयच्या चौकशीत आहे.

सिसोदियांच्या घरावर छापा 
19 ऑगस्ट रोजी सीबीआयने नवीन उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेसाठी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकला होता. यानंतर ईडीनेही या प्रकरणाची फाइल सीबीआयकडून घेतली. या प्रकरणी सीबीआयने 15 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

Web Title: CBI summons Manish Sisodia for questioning; Arvind Kejriwal said- 'He is today's Bhagat Singh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.