सीबीआय Vs पोलीस : सीबीआय घेणार सर्वोच्च न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 12:18 AM2019-02-04T00:18:01+5:302019-02-04T00:18:20+5:30
कारवाईसाठी आलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना बंगालमधील पोलिसांनी ताब्यात घेतल्याने निर्माण झालेल्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय सीबीआयने घेतला आहे.
नवी दिल्ली - कारवाईसाठी आलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना बंगालमधील पोलिसांनी ताब्यात घेतल्याने निर्माण झालेल्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय सीबीआयने घेतला आहे. सोमवारी सकाळी साडे दहा वाजता सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सीबीआयच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता पक्ष मांडणार आहेत.
शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने बंगालमध्ये अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि अजित डोभाल यांच्यावर टीका केली आहे.
CBI Interim Director M Nageshwar Rao: Tomorrow the CBI will approach the Supreme Court on the matter as the West Bengal police is not cooperating. pic.twitter.com/up2NjMuoPI
— ANI (@ANI) February 3, 2019