सीबीआयची विश्वासार्हता धाेक्यात; सरन्यायाधीशांची थेट टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 06:28 AM2022-04-02T06:28:33+5:302022-04-02T06:29:42+5:30

सरन्यायाधीशांनी सीबीआयच्या कार्यपद्धतीवर टीका करताना सांगितले की, सुरुवातीच्या काळात सीबीआयवर जनतेचा प्रचंड विश्वास हाेता.

CBI's credibility threatened; Criticism of the Chief Justice | सीबीआयची विश्वासार्हता धाेक्यात; सरन्यायाधीशांची थेट टीका

सीबीआयची विश्वासार्हता धाेक्यात; सरन्यायाधीशांची थेट टीका

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काही प्रकरणांमध्ये निष्क्रियता आणि कारवायांमुळे सीबीआयची विश्वासार्हता धाेक्यात आल्याची टीका देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामन यांनी केली. देशातील सर्व तपास यंत्रणांना एका स्वायत्त संस्थेच्या छताखाली आणण्याची गरज असल्याचेही मत सरन्यायाधीशांनी व्यक्त केले. सीबीआयच्या स्थापना दिनानिमित्त आयाेजित व्याख्यानात ते बाेलत हाेते. 

सरन्यायाधीशांनी सीबीआयच्या कार्यपद्धतीवर टीका करताना सांगितले की, सुरुवातीच्या काळात सीबीआयवर जनतेचा प्रचंड विश्वास हाेता. अनेक प्रकरणांची चाैकशी सीबीआयकडून करण्यासाठी न्यायपालिकांकडे माेठ्या प्रमाणावर विनंती अर्ज येत हाेते; पण कालांतराने आता चित्र बदलले आहे. इतर अनेक संस्थांप्रमाणे सीबीआयची विश्वासार्हता धाेक्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये सीबीआयची निष्क्रियता आणि कारवायांमुळे विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. न्या. रामन म्हणााले की, राजकीय प्रतिनिधित्व कालांतराने बदलत जाते. पण, तुम्ही स्थायी आहात. त्यामुळे तुम्ही कायद्याचे कठाेर पालन करून निष्पक्ष तपास करण्यावर भर द्यायला हवा. सीबीआयसह ईडी व इतर तपास संस्थांना तातडीने एकाच स्वायत्त संस्थेच्या छताखाली आणण्याची गरज आहे. या संस्थेचे अधिकार, कार्यपद्धती व कर्तव्ये स्पष्टपणे निर्धारित करावी लागतील, असे न्या. रामन यांनी सांगितले.

राजकारण्यांसाेबतचे हितसंबंध ताेडा
गमावलेला विश्वास पुन्हा मिळविण्यासाठी राजकारण्यांसाेबतचे हितसंबंध ताेडावे लागतील. जनतेचा विश्वास पुन्हा प्राप्त करण्याची काळाची गरज आहे, असे न्या. रामन म्हणाले.

Web Title: CBI's credibility threatened; Criticism of the Chief Justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.