सीबीआय की पोलीस? आज फैसला, न्यायालय निर्णय देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 05:10 AM2020-08-19T05:10:16+5:302020-08-19T05:10:29+5:30

सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिनेही सीबीआय तपासास आक्षेप घेतला आहे.

CBI's police? Judgment today, the court will rule today | सीबीआय की पोलीस? आज फैसला, न्यायालय निर्णय देणार

सीबीआय की पोलीस? आज फैसला, न्यायालय निर्णय देणार

Next

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवावे की नाही, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय बुधवारी सकाळी देणार आहे. हा तपास सीबीआयने कारण्यास महाराष्ट्राने विरोध दर्शविला आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिनेही सीबीआय तपासास आक्षेप घेतला आहे.
त्या निकालाकडे महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस, सरकार तसेच केंद्र सरकार आणि सीबीआयबरोबरच अनेकांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोळूस करीत असतानाच सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत तक्रार केली. त्याआधारे त्या पोलिसांनी एफआयआर नोंदविला आणि परस्पर मुंबईत तपास सुरू केला. त्यास मुंबई पिलिसांनी विरोध करताच हा तपास सीबीआयने करावा, अशी शिफारस बिहार सरकारने केंद्राकडे केली आणि लगेचच सीबीआयने तपास सुरू केला. मुंबई पोलीस तपास नीट करीत नसल्याचा आरोप सुशांच्या वडिलांनी केला आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूला रिया चक्रवर्ती कारणीभूत आहे आणि तिने त्याचे कोट्यवधी रुपये हडपले, असेही त्यांनी म्हटले आहे.
याउलट आम्ही व्यवस्थित तपास करीत आहोत, असा दावा मुंबई पोलिसांनी केला असून, त्यास महाराष्ट्र सरकारने दुजोरा दिला आहे. बिहारमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होत असल्याने या प्रकरणाला मुद्दाम वेगळा रंग दिला जात असल्याची टीका महाराष्ट्रातील सत्ताधारी करीत आहेत.

Web Title: CBI's police? Judgment today, the court will rule today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.