सीबीएसई : दहावी, बारावीत उत्तीर्ण घटले; तीन लाख विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 05:23 AM2023-05-13T05:23:16+5:302023-05-13T05:23:47+5:30
प्रथमच जाहीर झाली नाही गुणवत्ता यादी
नवी दिल्ली/पुणे/मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) बारावी आणि दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून, गतवर्षीच्या तुलनेत बारावीचा निकाल ६ टक्क्यांनी, तर दहावीचा निकाल दीड टक्क्यांनी घटला आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींचेच उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे.
यंदा दहावीचा निकाल ९३.१२ टक्के तर बारावीचा निकाल ८७.३३ टक्के लागला आहे. पुणे विभागाने दहावीच्या परीक्षेत देशात पाचवे, तर बारावीच्या परीक्षेत आठवे स्थान मिळवून घोडदौड केली. देशात ९९.९१ टक्के निकालासह त्रिवेंद्रम विभाग टॉपवर राहिला. पुढील वर्षीच्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होतील, असे सीबीएसईने जाहीर केले आहे.
दहावीचा निकाल
२०,१६,७७९
विद्यार्थी उत्तीर्ण
९३.१२%
एकूण निकाल
९४.४०%
निकाल गेल्या वर्षीचा. यावेळी निकाल १.२८ टक्क्यांनी घटला
बारावीचा
निकाल
१४,५०,१७४
विद्यार्थी उत्तीर्ण
८६.३३%
एकूण निकाल
९२.७१%
निकाल गेल्या वर्षीचा. यावेळी निकाल ५.३८ टक्क्यांनी घटला