CBSE 10th Result 2019: दहावीचा निकाल जाहीर, स्मृती इराणींच्या मुलीला मिळाले 'एवढे' टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 04:17 PM2019-05-06T16:17:41+5:302019-05-06T16:22:01+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
नवी दिल्लीः केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसईनं अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbseresults.nic.inवर निकाल दिला आहे. या दहावीच्या परीक्षेत 13 विद्यार्थी टॉपर ठरले आहेत. या सर्वच विद्यार्थ्यांनी 500 गुणांपैकी 499 गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे या परीक्षेला बसलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीला 10वीच्या परीक्षेत 82 टक्के मिळाले आहेत. स्मृती इराणींच्या मुलीचं नाव जोइश इराणी आहे. तत्पूर्वी स्मृती इराणींचा मुलगा जोहर इराणीनं 12वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डानं सीबीएसईची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आली होती. तर सीबीएसईची 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून 3 एप्रिलपर्यंत सुरू होती.
Bhavana N Sivadas from Kerala is the all India topper in CBSE Class-10th Exams with 499 marks out of 500. https://t.co/wInuOIpNH5
— ANI (@ANI) May 6, 2019
सीबीएसई बोर्डाच्या निकालात यंदा त्रिवेंद्रम विभागानं बाजी मारली आहे. या विभागाचा निकाल तब्बल 99.85 टक्के इतका लागला आहे. तर 99 टक्क्यांसह चेन्नई दुसऱ्या, 95.89 टक्क्यांसह अजमेर तिसऱ्या क्रमांकावर आहे. केरळमधील भावना एन. शिवदास ही विद्यार्थिनी परीक्षेत पहिली आली आहे. तिला 500 पैकी 499 गुण मिळाले आहेत. फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या दहावीच्या परीक्षेला जवळपास 18 लाख विद्यार्थी बसले होते.
Bhavana N Sivadas from Kerala and 12 other students secured 499 out of 500 marks in #CBSE Class X examinations. #CBSE10thresultpic.twitter.com/9c1SqyuOMe
— ANI (@ANI) May 6, 2019