प्रेरणादायी! लहानपणी आई गेली, बाबांनी घरातून बाहेर काढलं; आजीकडे राहून 'ती' झाली बिहार टॉपर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 16:16 IST2022-07-25T15:48:47+5:302022-07-25T16:16:25+5:30

श्रीजा हिने 99.4% गुण मिळवून संपूर्ण बिहारमध्ये पहिला नंबर पटकावला आहे. श्रीजाने या यशाचे श्रेय तिचे आजी, आजोबा, मामा, मावशी यांना दिले आहे.

cbse 10th topper bihar girl shreeja who lost her parents in childhood cbse girl viral story | प्रेरणादायी! लहानपणी आई गेली, बाबांनी घरातून बाहेर काढलं; आजीकडे राहून 'ती' झाली बिहार टॉपर

प्रेरणादायी! लहानपणी आई गेली, बाबांनी घरातून बाहेर काढलं; आजीकडे राहून 'ती' झाली बिहार टॉपर

नवी दिल्ली - सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल (CBSE 10th Board Exam Result) जाहीर झाला आहे. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. याच दरम्यान बिहारची टॉपर आलेल्या एका मुलीची जोरदार चर्चा रंगली आहे.  पाटणा येथील रहिवासी असलेल्या श्रीजा हिने 99.4% गुण मिळवून संपूर्ण बिहारमध्ये पहिला नंबर पटकावला आहे. श्रीजाने या यशाचे श्रेय तिचे आजी, आजोबा, मामा, मावशी यांना दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार. राजवंशीनगर येथील डीएव्ही शाळेची विद्यार्थिनी श्रीजा हिला संस्कृत आणि विज्ञान विषयात 100 गुण मिळाले आहेत. त्याचवेळी तिला एसएसटीमध्ये 99, गणितात 99 आणि इंग्रजीत 99 गुण मिळाले आहेत. श्रीजा तिच्या आजी आजोबांसोबत राहते. कारण श्रीजा पाच वर्षांची असताना तिच्या धाकट्या बहिणीचा जन्म झाला. प्रसूतीदरम्यान तिच्या आईचा मृत्यू झाला. श्रीजाच्या वडिलांना मुलगी आवडत नव्हती म्हणून त्यांनी तिला घरातून हाकलून दिले आणि पुन्हा दुसरं लग्न केले. 

श्रीजा तेव्हापासून तिच्या आजी-आजोबांच्या घरी राहू लागली. श्रीजाने दिलेल्या माहितीनुसार, आजी-आजोबांनी तिला इतकं प्रेम दिलं की ती आई-वडिलांशिवाय आहे, असं तिला कधीच वाटलं नाही. ती कधीच वेळ पाहून अभ्यास करत नाही, तर दिवसभर मन लावून अभ्यास करते. श्रीजाचा आवडता विषय गणित आहे, तर तिला एसएसटीची सर्वाधिक भीती वाटत होती, पण तिने इतके कष्ट केले की तिला गणित आणि एसएसटी या दोन्ही विषयांत 99 गुण मिळाले. 

श्रीजाच्या आजी कृष्णा देवी यांनी माझ्या मुलीच्या मुलीमुळे आज लोक मला ओळखत आहेत याचा मला खूप आनंद होत आहे. लहानपणीच अशा मुलीला घरातून हाकलून देणार्‍या बापाचे मला खूप वाईट वाटते. त्याचवेळी श्रीजाच्या आजोबांनी सांगितले की, मी आधी तीन मुलींचा बाप होतो, पण आता श्रीजा आणि तिची धाकटी बहीणही एकत्र राहतात, त्यामुळे आता मी पाच मुलींचा बाप आहे. मला अभिमान आहे की माझी मुलगी आज माझे नाव अभिमानाने उंचावत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: cbse 10th topper bihar girl shreeja who lost her parents in childhood cbse girl viral story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Biharबिहार