CBSE Board 10th Result 2023: १२ वी नंतर सीबीएसई बोर्डाचे १० वीचे निकालही जाहीर, असं करा चेक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 02:53 PM2023-05-12T14:53:31+5:302023-05-12T14:55:10+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (CBSE) १२ वी नंतर १० वीचा निकालही जाहीर केला आहे.
CBSE Board 10th Result 2023: सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचा बोर्डाचा परीक्षांचा निकाल आता लागला असून त्यांची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसईनं १२ वी नंतर १० वी चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना आपला निकाल उमंग ॲप, SMS, IVRS (इंटरॲक्टिव्ह वॉईस रिस्पॉन्स सिस्टम) आणि अधिकृत वेबसाईट cbse.gov.in, results.nic.in, results.digilocker.gov.in आणि umang.gov.in वर पाहता येणार आहे.
यावर्षी एकूण ९३.१२ टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेत. १० वीच्या निकालात त्रिवेंद्रम जिल्हा अव्वल राहिला. तर दुसरीकडे १२ वीचा ८७.३३ टक्के निकाल लागला. हा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. गेल्या वर्षी ९२.१७ टक्के निकाल लागला होता.
१२ वी च्या निकालातही त्रिवेंद्रम जिल्ह्यानं ९९.९१ टक्क्यांसह उत्तम कामगिरी केली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी बाजी मारली. ९०.६८ मुली तर ८४.६७ टक्के मुलं यावेळी उत्तीर्ण झाली. २०२३ मध्ये एकूण ३८,८३,७१० विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाची परीक्षा दिली होती. सीबीएसईच्या अधिकृत आकडेवारीनुसार यावर्षी २१,८६,९४० विद्यार्थिनी आणि१६,९६,७७० विद्यार्थ्यांनी १० वीची परीक्षा दिली.
असा पाहा निकाल
- निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम cbse.nic.in आणि cbse.gov.in या संकेतस्थळावर जा.
- त्यानंतर CBSE Board Result 2023 लिंकवर क्लिक किंवा लॉग इन करा.
- यानंतर तुमचा रोल नंबर अथवा रजिस्ट्रेशन नंबर टाका.
- त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
- यानंतर १०, १२ वी चा रिझल्ट स्क्रिनवर डिस्प्ले होईल.
- त्यानंतर तुम्ही तो डाऊनलोड करू शकता किंवा त्याची प्रिन्टआऊटही घेऊ शकता.