Breaking News: CBSE बोर्डाच्या परीक्षा कधी होणार?; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 05:46 PM2020-12-22T17:46:59+5:302020-12-22T18:03:41+5:30
CBSE board exams Postponed: देशभरातील शिक्षकांसोबत पोखरियाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्याचे वातावरण, परिस्थिती ही बोर्डाच्या परिक्षा घेण्यास अनुकुल नसल्याचे म्हटले.
नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या परिक्षेच्या तयारीला लागलेल्य़ा विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, परिक्षांची तारीख नंतर कळविली जाईल, असे केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी सांगितले.
देशभरातील शिक्षकांसोबत पोखरियाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्याचे वातावरण, परिस्थिती ही बोर्डाच्या परीक्षा घेण्यास अनुकुल नसल्याचे म्हटले. यामुळे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये परीक्षा होण्याची शक्यता नाही. परीक्षा कधी घेतली जाईल याचा निर्णय नंतर घेतला जाईल, असे पोखरियाल म्हणाले.
तसेच पोखरियाल यांनी परीक्षा रद्द करण्याबाबतही आपले मत मांडले. परीक्षा रद्द केल्या आणि विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलले तर तो त्यांच्यावर एक शिक्का बसेल. पुढे जाऊन या विद्यार्थ्यांना नोकरी किंवा उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळण्यास अडचणी येतील. ही परिस्थिती आपण विद्यार्थ्यांवर येऊ देणार नाही. त्यामुळे परीक्षा रद्द होणार नाहीत, परंतू पुढे ढकलण्यात येतील. १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जानेवारी, फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणार नाहीत. परिक्षांचा निर्णय फेब्रुवारीनंतर घेतला जाईल, असे ते म्हणाले.