सीबीएसई बोर्डाचा १० वीचा निकाल जाहीर, एकूण ९६.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

By admin | Published: May 28, 2016 02:28 PM2016-05-28T14:28:38+5:302016-05-28T14:48:09+5:30

बीएसई बोर्डाच्या १० वीच्या परीक्षेत एकूण ९६.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदा मुलीच अव्वल ठरल्या आहेत.

CBSE Board Results 10th, Total 9 6.21% Students Passed | सीबीएसई बोर्डाचा १० वीचा निकाल जाहीर, एकूण ९६.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

सीबीएसई बोर्डाचा १० वीचा निकाल जाहीर, एकूण ९६.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २८ - सीबीएसई बोर्डाच्या १० वीच्या परीक्षेचा निकाल लागला असून यंदा निकालात मुलीच अव्वल ठरल्या आहेत. या परीक्षेत एकूण ९६.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  ९६.३६ टक्के मुली व  ९६.११ टक्के मुलांनी परीक्षेत यश मिळवले.. तिरुअनंतपुरम विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९९.८७ टक्के इतका लागला आहे. 
१ मार्च ते २८ मार्च २०१६ दरम्यान घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी १२ लाख ९१ हजार २९३ विद्यार्थी बसले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षेला बसणा-यांचे प्रमाण ८.५ टक्क्यांनी वाढले. 
 
विभागनिहाय निकाल खालीलप्रमाणे :
अजमेर : ९६.६१ टक्के 
भुवनेश्वर : ९७.९० टक्के
चंदीगड : ९६.५३ टक्के
दिल्ली : ९०.४४ टक्के
गुवाहाटी : ८४.२१ टक्के
मद्रास :  ९८.५५ टक्के
पाटणा : ९६.४७
अलाहबाद : ९३.७९ टक्के 
तिरुअनंतपुरम : ९९.८७ टक्के
डेहराडून : ९६.७४ टक्के 

Web Title: CBSE Board Results 10th, Total 9 6.21% Students Passed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.