CBSE Exam: सीबीएसईच्या परीक्षा कधी होणार? 31 डिसेंबरला घोषणा करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 09:30 PM2020-12-26T21:30:18+5:302020-12-26T21:30:41+5:30
CBSE Exams : जानेवारी, फेब्रुवारीमध्ये बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, परिक्षांची तारीख नंतर कळविली जाईल, असे केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. मात्र, आज याबाबत माहिती देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : सीबीएसईच्या परिक्षेच्या तयारीला लागलेल्य़ा विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. या परीक्षा जानेवारी, फेब्रुवारीमध्ये होणार नाहीत, असे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले असले तरीही त्यांच्या तारखेची घोषणा 31 डिसेंबरला केला जाणार आहे.
जानेवारी, फेब्रुवारीमध्ये बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, परिक्षांची तारीख नंतर कळविली जाईल, असे केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. मात्र, आज याबाबत माहिती देण्यात आली आहे.
The date for the commencement of upcoming CBSE board exams to be announced on 31st December: Union Education Minister
— ANI (@ANI) December 26, 2020
तसेच पोखरियाल यांनी परीक्षा रद्द करण्याबाबतही आपले मत मांडले. परीक्षा रद्द केल्या आणि विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलले तर तो त्यांच्यावर एक शिक्का बसेल. पुढे जाऊन या विद्यार्थ्यांना नोकरी किंवा उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळण्यास अडचणी येतील. ही परिस्थिती आपण विद्यार्थ्यांवर येऊ देणार नाही. त्यामुळे परीक्षा रद्द होणार नाहीत, परंतू पुढे ढकलण्यात येतील. १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जानेवारी, फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणार नाहीत, असे ते म्हणाले होते.