CBSE Results 2020 : मोठी बातमी! CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 12:38 PM2020-07-14T12:38:56+5:302020-07-14T12:54:18+5:30
CBSE Results 2020 : सीबीएसई बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे.
नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. त्यानंतर आता सीबीएसई बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल बुधवारी (15 जुलै) जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. cbse.nic.in, www.results.nic.in आणि www.cbseresults.nic.in या वेबसाईट्सवर विद्यार्थी निकाल पाहू शकतात.
असा पाहा निकाल
- सर्वप्रथम निकाल पाहण्यासाठी सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in वर जा.
- वेबसाईटवर देण्यात आलेल्या दहावी निकाल या लिंकवर क्लिक करा.
- आपला रोल नंबर टाका आणि आवश्यक ती माहिती द्या
- निकाल पाहता येईल. डाऊनलोड करता येईल.
CBSE to announce class 10 result on July 15
— Press Trust of India (@PTI_News) July 14, 2020
सोमवारी (13 जुलै) सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा 88.78 टक्के विद्यार्थांनी बारावीची परीक्षा पास केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मुलींनी बाजी मारली असून सीबीएसई बोर्डात 92.15 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 86.19 टक्के मुलं पास झाली आहेत.
My dear Children, Parents, and Teachers, the results of class X CBSE board examinations will be announced tomorrow. I wish all the students best of luck.👍#StayCalm#StaySafe@cbseindia29
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) July 14, 2020
महत्त्वाच्या बातम्या
चीनने 59 अॅप्सच्या बंदीवर पुन्हा एकदा विचारला प्रश्न, भारताने दिलं 'हे' सडेतोड उत्तर
बंगल्यात आणखी काही दिवस राहू द्या, प्रियंका गांधींनी केली मोदींना विनंती?, जाणून घ्या सत्य
Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा आणखी एक प्लॅन आला समोर, रिक्षाचालकाने केला खुलासा
Google भारतात 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार, सुंदर पिचाईंची मोठी घोषणा