सीबीएसई दहावी, बारावीच्या परीक्षा 4 मेपासून होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 01:01 AM2021-01-01T01:01:51+5:302021-01-01T10:54:05+5:30

रमेश पोखरियाल यांनी सांगितले की, बोर्ड परीक्षांचे प्रॅक्टिकल शाळांमध्ये १ मार्चपासून सुरू होतील.

CBSE X, XII examinations will start from 4th May | सीबीएसई दहावी, बारावीच्या परीक्षा 4 मेपासून होणार

सीबीएसई दहावी, बारावीच्या परीक्षा 4 मेपासून होणार

Next

नवी दिल्ली : सीबीएसई दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा ४ मे रोजी सुरू होणार असून १० जूनपर्यंत चालतील. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी ही माहिती दिली. बोर्ड परीक्षांचे निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर करण्यात येतील.

रमेश पोखरियाल यांनी सांगितले की, बोर्ड परीक्षांचे प्रॅक्टिकल शाळांमध्ये १ मार्चपासून सुरू होतील. सीबीएसईकडून लवकरच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. त्यांनी सांगितले की, बोर्ड परीक्षांचे आयोजन करण्याबाबत पालक, विद्यार्थी व देशातील शिक्षण तज्ज्ञ यांच्याकडून सूचना मागविल्या होत्या. सीबीएसईने यंदा अभ्यासक्रमात ३० टक्के कपात केली आहे.
 

Web Title: CBSE X, XII examinations will start from 4th May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.