विद्यार्थी, पालकांसाठी खूशखबर; CBSEची परीक्षा होणार सोपी... जाणून घ्या कशी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 11:29 AM2019-02-13T11:29:33+5:302019-02-13T11:30:33+5:30

काठिण्य पातळीच्या दृष्टीने सीबीएसईची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अवघड समजली जाते. त्यातच यावर्षी सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन आठवडे लवकर सुरू होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर काहीसे दडपण आले आहे.

CBSE's examination will be easy ... Learn how! | विद्यार्थी, पालकांसाठी खूशखबर; CBSEची परीक्षा होणार सोपी... जाणून घ्या कशी!

विद्यार्थी, पालकांसाठी खूशखबर; CBSEची परीक्षा होणार सोपी... जाणून घ्या कशी!

googlenewsNext
ठळक मुद्देकाठिण्य पातळीच्या दृष्टीने सीबीएसईची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अवघड समजली जाते यावर्षी सीबीएसईच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काही प्रमाणात बदलण्यात आले आहे. त्यामुळे सीबीएसईचे यावर्षीचे पेपर गतवर्षांच्या तुलनेत काही प्रमाणात सोपे असणार आहेतसीबीएसईची दहावी आणि 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे

नवी दिल्ली - काठिण्य पातळीच्या दृष्टीने सीबीएसईची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अवघड समजली जाते. त्यातच यावर्षी सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन आठवडे लवकर सुरू होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर काहीसे दडपण आले आहे. मात्र असे असले तरी या परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थी आणि पालकांसाठी सीबीएसईने एक मोठी खूशखबर दिली आहे. यावर्षी सीबीएसईच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काही प्रमाणात बदलण्यात आले आहे. त्यामुळे सीबीएसईचे यावर्षीचे पेपर गतवर्षांच्या तुलनेत काही प्रमाणात सोपे असणार आहेत. सीबीएसईची दहावी आणि 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. 

 सीबीएसईच्या यावर्षीच्या परीक्षेत ऑब्जेक्टिव्ह प्रकारच्या प्रश्नांची संख्या वाढवण्यात आली आहे. याशिवाय प्रश्नांबाबतचे पर्यायही वाढवण्यात आले आहेत. ''दरवर्षी परीक्षेमध्ये 10 टक्के प्रश्न ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतात. पण यावर्षी मात्र 25 टक्के प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतील. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार असून, त्यांना चांगले गुण मिळवणे शक्य होणार आहे.'' असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच विद्यार्थी एखाद्या प्रश्नाबाबत पूर्णपणे आश्वस्त नसतील तर त्यांच्यासाठी 33 टक्के पर्यायी प्रश्न उपलब्ध असतील, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली. 

 यावेळी विद्यार्थ्यांना एक सुव्यवस्थित प्रश्नपत्रिका मिळणार आहे. त्यात सर्व प्रश्न विविध उपविभागात विभागलेले असतील. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न एकाच विभागात असतील. त्यानंतर अधिक गुण असलेले प्रश्न असतील. 

पेपर फुटीला आळा घालण्यासाठी सीबीएसईने यावेळी काही कठोर पावले उचलली आहेत. परीक्षा केंद्रांवर ज्या परीक्षा नियंत्रकांना गोपनीय दस्तऐवज सांभाळायचे आहेत. अशा अधिकाऱ्यांचे रिअल टाइम ट्रँकिंग केले जाणार आहे. गतवर्षी   दहावीचा गणित आणि बारावीचा अर्थशास्त्र विभागाचा पेपर फुटला होता. 
 

Web Title: CBSE's examination will be easy ... Learn how!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.