CCD Owner Missing : CCD चे मालक आणि कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 08:45 AM2019-07-30T08:45:54+5:302019-07-30T11:56:40+5:30

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ हे सोमवारपासून बेपत्ता झाले आहेत. व्ही. जी. सिद्धार्थ हे प्रसिद्ध कॅफे चेन CCD (कॅफे कॉफी डे) चे मालक आहेत.

ccd owner and son in law of former cm sm krishna vg siddhartha has gone missing search operation underway | CCD Owner Missing : CCD चे मालक आणि कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता

CCD Owner Missing : CCD चे मालक आणि कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता

googlenewsNext
ठळक मुद्देकर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ हे सोमवारपासून बेपत्ता झाले आहेत.व्ही. जी. सिद्धार्थ हे प्रसिद्ध कॅफे चेन CCD चे मालक आहेत. कर्नाटक पोलिसांनी नदी आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. 

नवी दिल्ली - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ हे सोमवारपासून बेपत्ता झाले आहेत. व्ही. जी. सिद्धार्थ हे प्रसिद्ध कॅफे चेन CCD (कॅफे कॉफी डे) चे मालक आहेत. सिद्धार्थ हे सोमवारी (29 जुलै) आपल्या कारने प्रवास करत होते.  दरम्यान मंगळुरू येथील नेत्रावती नदीच्या परिसरात ते असल्याची माहिती मिळाली होती. मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे कर्नाटकपोलिसांनी नदी आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, काँग्रेस नेते डीके शिवकुमार, बीएस शंकर हेदेखील एस. एम. कृष्णा यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. सोमवारपासून बेपत्ता असलेल्या सिद्धार्थ यांचा फोनही स्विच ऑफ असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ सोमवारी संध्याकाळी जवळपास सहा वाजण्याच्या सुमारास नेत्रावती नदीच्या पुलाजवळ कारमधून उतरले. त्यांनी ड्रायव्हरला लगेचच येतो असं सांगितलं. ड्रायव्हरने ही अर्धा तास त्यांची वाट पाहिली पण सिद्धार्थ परत आलेच नाहीत. तसेच त्यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचा फोनदेखील बंद आहे. त्यामुळे ड्रायव्हरने सिद्धार्थ यांच्या घरी फोन करून ते बेपत्ता असल्याची माहिती दिली. 

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी नदी आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम वेगाने सुरू केली आहे. सिद्धार्थ हे बेपत्ता होण्याआधी काही वेळ त्यांचा ड्रायव्हर त्यांच्या सोबत असल्याने पोलीस ड्रायव्हरची चौकशी करत आहेत. तसेच व्ही. जी. सिद्धार्थ यांचे कॉल डीटेल्सही तपासण्यात येत आहेत. 

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाने 2017 मध्ये छापे घातले होते. सिद्धार्थ हे कॅफे कॉफी डे (सीसीडी) ग्रुपचे संस्थापक, मालक व अध्यक्ष आहेत. सिद्धार्थ 17 जानेवारी 2015  रोजी या कंपनीचे अध्यक्ष झाले. या धाडीनंतर शेअर बाजारात कॉफी डे इंटरप्राइजेसचे शेअर भाव कोसळले होते. तर एस. एम. कृष्णा हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. ते काही काळ महाराष्ट्राचे राज्यपाल व त्याआधी केंद्रातही मंत्री होते. 



Web Title: ccd owner and son in law of former cm sm krishna vg siddhartha has gone missing search operation underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.