आधी गोळ्या झाडल्या, नंतर ग्रेनेड फेकले... CISF बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे CCTV फुटेज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 02:40 PM2022-04-23T14:40:27+5:302022-04-23T14:41:02+5:30

CISF bus on terrorist attack: सीआयएसएफच्या बसला कशाप्रकारे लक्ष्य करण्यात आले, याचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) समोर आले आहे. 

cctv footage of the terrorist attack on the bus carrying cisf personnel in the sunjwan area of jammu | आधी गोळ्या झाडल्या, नंतर ग्रेनेड फेकले... CISF बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे CCTV फुटेज

आधी गोळ्या झाडल्या, नंतर ग्रेनेड फेकले... CISF बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे CCTV फुटेज

Next

जम्मू-काश्मीर : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) बसवर शुक्रवारी दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सहायक उपनिरीक्षक (एएसआय) एसपी पाटील शहीद झाले. तर बसमध्ये बसलेले अन्य दोघे जखमी झाले. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. एकापाठोपाठ एक झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दरम्यान, सीआयएसएफच्या बसला कशाप्रकारे लक्ष्य करण्यात आले, याचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) समोर आले आहे. 

2 मिनिटे आणि 2 सेकंदांचा हा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केला आहे. या व्हिडिओची प्रत्येक फ्रेम तुम्हाला हादरवेल. हा व्हिडीओ चढ्ढा कॅम्प भागातील आहे. रस्त्यावर दिवे लागले आहेत. विजेचे खांब आणि काही तारा दिसत आहेत. वेळ पहाटेची आहे. रस्त्यावर शांतता आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये सुमारे 30 सेकंदांनंतर चौकात एक दुचाकी दिसत आहे. तेवढ्यात बस येण्याचा आवाज येतो. मात्र काही क्षणातच मोठा आवाज झाल्याने संपूर्ण परिसर हादरला. आधी गोळ्या झाडल्या आणि नंतर ग्रेनेडने हल्ला केला. क्षणार्धात शांततेचे स्फोटात रूपांतर झाले. आगीच्या ठिणग्या आणि धुराचे लोट दिसू लागले.

हल्ल्यानंतर दहशतवादी घरात लपले
सकाळी सव्वा चार वाजता जम्मूतील चड्ढा कॅम्पजवळ ड्युटीवर जात असलेल्या 15 सीआयएसएफ जवानांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. सीआयएसएफ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. तसेच, या कारवाईत सीआयएसएफचा एक एएसआय शहीद झाला. यासोबतच चार जवानही जखमी झाले आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सीआयएसएफ बसवर हल्ला केल्यानंतर दहशतवादी परिसरातील मोहम्मद अन्वर यांच्या घरात लपले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीर दौऱ्यावर 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 24 एप्रिलला जम्मू-काश्मीर दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा मोठा कट असल्याचा संशय सुरक्षा दलांना होता. त्यानुसार, गुरुवारी संध्याकाळपासून जम्मू पोलिसांनी लष्कर आणि निमलष्करी दलांसह शहरातील अनेक भागात शोधमोहीम राबवली. ही शोध मोहीम शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरू होती आणि या कारवाईदरम्यान सीआयएसएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर गोळीबार सुरू केला.

Web Title: cctv footage of the terrorist attack on the bus carrying cisf personnel in the sunjwan area of jammu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.