एकानं तारा हलवल्या अन् एका क्षणात कोसळला मोरबीचा झुलता पूल; CCTV मध्ये थरारक घटना कैद, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 12:01 PM2022-10-31T12:01:17+5:302022-10-31T12:03:39+5:30

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक झुलता पूल रविवारी संध्याकाळी सात वाजता अचानक कोसळला. त्या पुलावरील सुमारे ५०० हून अधिक जण नदीच्या पात्रात पडले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

CCTV footage shows people shaking Morbi bridge moments before tragedy | एकानं तारा हलवल्या अन् एका क्षणात कोसळला मोरबीचा झुलता पूल; CCTV मध्ये थरारक घटना कैद, पाहा...

एकानं तारा हलवल्या अन् एका क्षणात कोसळला मोरबीचा झुलता पूल; CCTV मध्ये थरारक घटना कैद, पाहा...

googlenewsNext

मोरबी : 

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक झुलता पूल रविवारी संध्याकाळी सात वाजता अचानक कोसळला. त्या पुलावरील सुमारे ५०० हून अधिक जण नदीच्या पात्रात पडले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १७७ जणांना वाचवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत.  

सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुलावर असलेले काही जण पुलाच्या तारा हलवत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही टवाळखोरांच्या उपद्रवामुळे ही घटना घडली तर नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी या पुलाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या एजन्सीविरोधात ३०४, ३०८ आणि ११४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणी तपासही सुरू करण्यात आला आहे.

बचाव कार्यात लष्कर, हवाई दल आणि नौदलासह, अग्निशमन दल आणि एनडीआरएफचीही मदत घेतली जात आहे. यात आतापर्यंत १७७ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे. रात्री जवळपास तीन वाजता लष्कराची टीम या ठिकाणी पोहोचली. आम्ही मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहोत. एनडीआरएफच्या टीमकडूनही बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती भारतीय लष्कराचे मेजेर गौरव यांनी दिली.

नुकतीच झाली होती दुरूस्ती
मोरबी येथील पूल रविवारी कोसळला तेव्हा त्यावर शेकडो लोक होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नुकताच नूतनीकरण केलेला केबल पूल काही दिवसांतच कोसळल्यामुळे त्या कामाच्या दर्जाबाबतदेखील अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. या पुलाच्या नूतनीकरणाच्या कामाची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी आता होत आहे. या पुलाची मध्यभागी दोन शकले होऊन ते नदीत कोसळले. 

१४० वर्षे जुना केबल पूल
मोरबी येथील हा केबल किंवा सस्पेन्शन पूल १४० वर्षे जुना आहे. त्याची लांबी ७६५ फूट आहे. या पुलाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. २० फेब्रुवारी १८७९ रोजी या पुलाचे उद्घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी केले होते. मोरबी येथे मच्छू नदीवर हा केबल पूल बांधण्यासाठी ३.५ लाख रुपये खर्च आला होता. या पुलाच्या बांधकामासाठी सारे सामान इंग्लंडहून आणण्यात आले होते. 

Web Title: CCTV footage shows people shaking Morbi bridge moments before tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.