‘निर्भया’ फंडातून २० हजार रेल्वेत लागणार सीसीटीव्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2015 11:21 PM2015-08-23T23:21:34+5:302015-08-23T23:21:34+5:30

रेल्वेगाड्यांमधील सुरक्षा वाढविण्याच्या हेतूने भारतीय रेल्वेने ‘निर्भया फंडा’च्या ७०० कोटी रुपयांतून २० हजार रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे.

CCTV to run 20,000 trains from 'Nirbhaya' fund | ‘निर्भया’ फंडातून २० हजार रेल्वेत लागणार सीसीटीव्ही

‘निर्भया’ फंडातून २० हजार रेल्वेत लागणार सीसीटीव्ही

Next

नवी दिल्ली : रेल्वेगाड्यांमधील सुरक्षा वाढविण्याच्या हेतूने भारतीय रेल्वेने ‘निर्भया फंडा’च्या ७०० कोटी रुपयांतून २० हजार रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. पंतप्रधान कार्यालयात नुकत्याच झालेल्या एका बैठकीत नव्या मार्गांचे काम, रेल्वे ओव्हरब्रिज, अंडरब्रिजचे बांधकाम, तसेच प्रवाशांना उत्तम सुविधा आणि सुरक्षा पुरविणाऱ्या योजनांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या कामास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे ‘निर्भया’ फंडातून लवकर निधी मिळविण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्रालयासोबत समन्वय सुरू आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. बहुतांश रेल्वेगाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची रेल्वेची योजना आहे; मात्र आतापर्यंत फार थोड्या गाड्यांमध्ये हे कॅमेरे लावण्यात आले आहेत.

Web Title: CCTV to run 20,000 trains from 'Nirbhaya' fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.