जिल्हा बँकेच्या ५० शाखांमध्ये सीसीटीव्ही सुरक्षितता : तिजोरीसाठी गोदरेज व स्टीलेज कंपनीसोबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2016 12:10 AM2016-03-23T00:10:30+5:302016-03-23T00:10:30+5:30
जळगाव : जिल्हा बँकेतर्फे ५० शाखांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा व अलाराम बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासह जिल्हा बँक शाखेतील रक्कम सुरक्षित रहावी यासाठी गोदरेज व स्टीलेज कंपनीसोबत चर्चा सुरू आहे.
Next
ज गाव : जिल्हा बँकेतर्फे ५० शाखांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा व अलाराम बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासह जिल्हा बँक शाखेतील रक्कम सुरक्षित रहावी यासाठी गोदरेज व स्टीलेज कंपनीसोबत चर्चा सुरू आहे.गाळण येथील जिल्हा बँक शाखेत रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी दरोडा टाकला होता. यात वॉचमनला मारहाण करीत तिजोरी फोडून चोरट्यांनी आठ लाखांची रक्कम लुटून नेली होती. यापूर्वीदेखील जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये चोरीचा प्रयत्न झाला होता. त्या अनुषंगाने जिल्हा बँक प्रशासनाने सर्व शाखांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व नवीन तिजोरी बसविण्याचा निर्णय घेतला होता.५० शाखांमध्ये काम सुरूसध्या जिल्हा बँकेतर्फे ५० शाखांमध्ये सीसीटीव्ही व अलाराम बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जळगाव येथील शकुंतला एण्टरप्रायजेस्मार्फत हे काम सुरू आहे. जिल्हा बँक शाखेत वॉचमन नियुक्तीला बँकने यापूर्वीच परवानगी दिली आहे. सीसीटीव्ही व अलाराम बसविल्यामुळे चोरट्याच्या हालचाली टिपता येणार आहे. त्यामुळे चोरी, घरफोडी किंवा दरोड्याच्या घटना झाल्यानंतर आरोपींना पकडता येणे सहज शक्य होणार आहे.गोदरेज कंपनीसोबत चर्चा सुरूजिल्हा बँकेतर्फे सीसीटीव्ही सोबतच संपूर्ण २५० शाखांमधील तिजोरी बदलविण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्यासाठी जिल्हा बँक प्रशासन गोदरेज व स्टीलेज या दोन कंपनीसोबत चर्चा करीत आहेत. गॅस कटरचा वापर केला तरीदेखील ही तिजोरी तोडता येणार नाही अशा मजबूत तिजोरीच्या खरेदीला प्राधान्य देण्यात येणार आहे. गोदरेज कंपनीतर्फे काही दिवसात याबाबतचे प्रात्याक्षिक दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय होऊन सर्व २५० शाखांमध्ये या तिजोरी बसविण्यात येणार आहे.कोटजिल्हा बँकेतील ५० शाखांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे. लवकरच तिजोरी बदलविण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी गोदरेज व स्टीलेज कंपनीसोबत चर्चा सुरू आहे.जितेंद्र देशमुख, कार्यकारी संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जळगाव