Bipin Rawat: “अफगाणिस्तानात जे घडतेय, त्याचे परिणाम जम्मू-काश्मीरमध्ये दिसू शकतील”: बिपिन रावत 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 04:42 PM2021-10-24T16:42:08+5:302021-10-24T16:42:59+5:30

अफगाणिस्तानात जे घडतेय, त्याचे परिणाम जम्मू-काश्मीरमध्ये दिसू शकतील, अशी चिंता रावत यांनी व्यक्त केली आहे. 

cds bipin rawat warn about effect of afghanistan taliban in jammu kashmir and internal security | Bipin Rawat: “अफगाणिस्तानात जे घडतेय, त्याचे परिणाम जम्मू-काश्मीरमध्ये दिसू शकतील”: बिपिन रावत 

Bipin Rawat: “अफगाणिस्तानात जे घडतेय, त्याचे परिणाम जम्मू-काश्मीरमध्ये दिसू शकतील”: बिपिन रावत 

Next

गुवाहाटी:तालिबानने अफगाणिस्तावर ताबा मिळवल्यानंतर सत्ता स्थापन केली. मात्र, जागतिक स्तरावर अद्यापही या तालिबान सरकारबाबत कोणीही काहीच बोलायला तयार नाही, असे दिसत आहे. अशातच तालिबान सरकार आल्यानंतर त्याचा भारतावर विशेषतः जम्मू-काश्मीरवर काय होतील, याबाबत देशात चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. यातच आता चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांनी यासंदर्भात महत्त्वाचा इशारा दिला आहे. अफगाणिस्तानात जे घडतेय, त्याचे परिणाम जम्मू-काश्मीरमध्ये दिसू शकतील, अशी चिंता रावत यांनी व्यक्त केली आहे. 

चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत गुवाहाटीमधील एका कार्यक्रमात बोलत होते. सामान्य नागरिक आणि पर्यटकांना कडेकोट तपासणीचा त्रास होईल. मात्र, हे सर्व त्यांच्या सुरक्षेसाठी आहे हे त्यांना समजून घ्यावे लागेल. प्रत्येक नागरिकाला देशाच्या अंतर्गत सुरक्षेविषयी जागरुक केले पाहिजे, असे बिपिन रावत यांनी म्हटले आहे. 

आपल्या सुरक्षेसाठी कुणीही येणार नाही

आपल्या सुरक्षेसाठी कुणीही येणार नाही, आपल्यालाच आपले तसेच आपल्या लोकांचे आणि आपल्या संपत्तीचे संरक्षण करावे लागेल. देशाची अंतर्गत सुरक्षा आपल्यासाठी काळजीचा विषय आहे. याला तोंड देण्यासाठी आपल्याला नागरिकांना प्रशिक्षित करावे लागेल, असे सांगत अफगाणिस्तानमध्ये जे घडत आहे त्याचे परिणाम जम्मू आणि काश्मीरमध्ये दिसू शकतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्याला त्यासाठी तयार राहायला लागेल, असे रावत यांनी स्पष्ट केले. 

...तर आपल्याला देशाची अंतर्गत सुरक्षा राखू शकू

देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांची कर्तव्य समजली तर आपल्याला देशाची अंतर्गत सुरक्षा राखू शकू. नागरिकांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत त्यांच्या कर्तव्याचे पालन करावे. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य बजावले तर आपल्याला या परिस्थितीचा सामना करता येईल. तुमच्या शेजारी कोण लोक येऊन राहतात याविषयी तुम्हाला माहिती असली पाहिजे. आपण सतर्क असलो तर कोणताही दहशतवादी आपल्या शेजारी येऊन राहू शकत नाही. कुणालाही काहीही संशयास्पद वाटले तर नागरिकांनी प्रश्न विचारले पाहिजे. तसेच त्याविषयी पोलिसांना माहिती दिली पाहिजे, असे रावत यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

 

Web Title: cds bipin rawat warn about effect of afghanistan taliban in jammu kashmir and internal security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.