CDS Bipin Rawat Chopper Crash: चॉपर क्रॅशमागे ISI आणि LTTEचा हात? निवृत्त ब्रिगेडियर सावंत यांना वेगळीच शंका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 03:59 PM2021-12-10T15:59:47+5:302021-12-10T16:00:09+5:30

CDS Bipin Rawat Chopper Crash: सीडीएस बिपीन रावत यांच्या चॉपरला झालेल्या अपघाताची चौकशी सुरू

cds general bipin rawat helicopter crash conspiracy of ltte and isi retired brigadier sudhir sawant | CDS Bipin Rawat Chopper Crash: चॉपर क्रॅशमागे ISI आणि LTTEचा हात? निवृत्त ब्रिगेडियर सावंत यांना वेगळीच शंका

CDS Bipin Rawat Chopper Crash: चॉपर क्रॅशमागे ISI आणि LTTEचा हात? निवृत्त ब्रिगेडियर सावंत यांना वेगळीच शंका

googlenewsNext

नवी दिल्ली: देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचा बुधवारी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. तमिळनाडूमधील कुन्नूर येथून वेलिंग्टनला जात असताना रावत यांचं चॉपर कोसळलं. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये रावत, त्यांच्या पत्नी आणि १२ जण होते. चॉपरमध्ये असलेल्या १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला, तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंह रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. अपघात नेमका कसा झाला, त्यामागची नेमकी कारणं काय याचा तपास सुरू आहे. मात्र या अपघाताबद्दल निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. 

सीडीएस बिपीन रावत यांच्या चॉपरला झालेल्या अपघातामागे एलटीटीई असू शकते, असा संशय सावंत यांनी व्यक्त केला आहे. सावंत यांनी ३५ वर्षे लष्करात सेवा दिली आहे. 'तमिळ ईलमच्या लिबरेशन टायगर्सचे केडर आयईडी बॉम्ब प्लांट करण्यात निष्णात आहेत. अशा प्रकारची कारवाई करणारे लोक त्या संघटनेकडे मोठ्या प्रमाणात आहेत,' असा दावा सावंत यांनी केल्याचं वृत्त दैनिक भास्करनं दिलं आहे.

'ज्या भागात सीडीएस बिपीन रावत यांचं चॉपर क्रॅश झालं, तो भाग एलटीटीईचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात वास्तव्यास असलेले अनेक सर्वसामान्य लोक एलटीटीईचे समर्थक आहेत. ज्याप्रकारे रावत यांचं चॉपर कोसळलं, ती पद्धत एलटीटीईच्या घातपाती कारवायांशी साधर्म्य असणारी आहे,' असं सावंत म्हणाले. 

तमिल ईलमचे लिबरेशन टायगर्स बऱ्याच कालावधीपासून भारतीय लष्करावर नाराज आहेत. लष्करानं एलटीटीईचं नेटवर्क उद्ध्वस्त केलं आहे. त्यामुळे या कटात एलटीटीईचे लोक आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असू शकतो, अशी शंका सावंत यांनी उपस्थित केली. आयएसआय आणि एलटीटीई यांनी मिळून चॉपर पाडलं असावा असा संशय त्यांनी व्यक्त केला. 

हेलिकॉप्टरमध्ये बॉम्ब स्फोट घडवणं सोपं काम नाही. मात्र ज्याप्रकारे रावत यांचं चॉपर अपघातग्रस्त झालं, ते काम करण्यासाठी एलटीटीईला मोठ्या केडरची गरज नाही. केवळ दोन माणसं अशा प्रकारची कारवाई करू शकतात, असं सावंत म्हणाले.

Web Title: cds general bipin rawat helicopter crash conspiracy of ltte and isi retired brigadier sudhir sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.