पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 08:29 AM2017-07-31T08:29:52+5:302017-07-31T08:36:41+5:30

पाकिस्तानकडून रविवारी ( 30 जुलै ) शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ भारतीय चौक्यांवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Ceasefire violation in Baba Khori area of sector Nowshera | पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर 

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर 

Next

श्रीनगर, दि. 31 - पाकिस्तानकडून रविवारी ( 30 जुलै ) शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ भारतीय चौक्यांवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. राजौरीचे उपायुक्त शाहिद इकबाल चौधरी यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून रविवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास राजौरी जिल्ह्यातील नौशेरा परिसरात गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. जून महिन्यात पाकिस्तानकडून 23 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन, पाकिस्तानच्या बॅट टीमचा हल्ल्यात आणि घुसखोरीच्या घटनांमध्ये तीन जवान शहीद झाले होते तर चार स्थानिकांचा मृत्यू झाला होता व 12 जण जखमी झाले होते.


जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
दरम्यान, 30 जुलैला जवानांनी पाकिस्तान पृरस्कृत दहशतवाद्यांचा घुसखोरीचे प्रयत्न उधळून लावला आहे. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती सुरूच आहेत. पुलवामा जिल्ह्यातील तहाब भागातील चकमकीत सुरक्षा जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. रविवारी सकाळपासूनच दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरू होती.

 



मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील तहाब भागातील एका घरात तळ ठोकून बसले होते. भारतीय लष्कराला माहिती मिळताच त्यांनी दहशतवाद्यांना घेरले व चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पाकिस्तानकडून मागील काही दिवसांपासून नियंत्रण रेषेचं उल्लघंन आणि घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय जवानदेखील पाकिस्तानच्या या कृत्याला सडेतोड उत्तर देत आहेत.  

तर मागील सहा महिन्यात सुरक्षा दलांनी 92 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यावर्षी 2 जुलैपर्यंत जवानांनी जवळपास 92 दहशतवाद्यांना ठार केले आहे. 2016 मध्ये जुलैपर्यंतची आकडेवारी पाहायला गेल्यास हा आकडा 79 इतका होता. दहशतवादीविरोधी कारवाईत या व वर्षात खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा आकडा 2012 आणि 2013 मधील वार्षिक आकडेवारीपेक्षाही जास्त आहे. त्यावेळी यूपीए सरकार सत्तेत होते.

लष्कराला मोठं यश 
जम्मू काश्मीरमध्ये 2012 रोजी 72 तर 2013मध्ये 67 दहशतवादी ठार करण्यात आले होते. एनडीएच्या कार्यकाळात 2014मध्ये हा आकडा वाढून 110 वर पोहोचला. 2015 मध्ये एकूण 108 तर 2016 मध्ये 150 दहशतवादी मारले गेले. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, "यावर्षी 2 जुलैपर्यंत ठार केल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या 2014 आणि 2015 मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आकड्यापेक्षा थोडी कमी आहे". दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या चोख कारवाईचे श्रेय लष्कर, केंद्रीय दल, राज्य सरकार आणि गुप्तचर यंत्रणांमधील उत्तम समन्वयाचे आहे. 

कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा 
यावर्षी 2 जुलैपर्यंत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा समावेश आहे याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितल्यानुसार, "सुरक्षा जवानांना खो-यात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन, त्यांचा खात्मा करण्यासाठी मोकळीक दिली आहे. दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू करण्याआधी संपूर्ण प्लान तयार केला जातो. तसंच कमीत कमी नुकसान करुन दहशतवाद्यांना कसे ठार करता येईल याकडेही लक्ष दिले जाते". 
 

Web Title: Ceasefire violation in Baba Khori area of sector Nowshera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.