सुप्रसिद्ध हिंदी लेखक, साहित्यिक नामवर सिंह यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 08:59 AM2019-02-20T08:59:06+5:302019-02-20T08:59:21+5:30

 प्रसिद्ध हिंदी लेखक आणि साहित्यिक नामवर सिंह यांचं निधन झालं.

Celebrated Hindi author, literary critic Namvar Singh dies at 92. | सुप्रसिद्ध हिंदी लेखक, साहित्यिक नामवर सिंह यांचं निधन

सुप्रसिद्ध हिंदी लेखक, साहित्यिक नामवर सिंह यांचं निधन

Next

नवी दिल्ली:  प्रसिद्ध हिंदी लेखक आणि साहित्यिक नामवर सिंह यांचं निधन झालं. नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी काल रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला, मृत्युसमयी ते 92 वर्षांचे होते. नामवर सिंह यांच्यावर पार्थिवावर बुधवारी दिल्लीतील लोधी रोडवर असलेल्या स्मशानघाटात दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नामवर सिंह यांनी डझनांहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या. कविताचे नवीन प्रतिमान(1968), छायावाद(1955), दुसरी परंपरा की खोज(1982) या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या.


इतिहास आणि आलोचना(1957), कहानी : नयी कहानी (1964), वाद विवाद आणि संवाद(1989) यांसारख्या कादंबऱ्यासुद्धा त्यांनी लिहिल्या. नामवर सिंह यांचा जन्म 28 जुलै 1927ला वाराणसीतल्या एका छोट्याशा खेडेगावात झाला. त्यानंतर कौशल्याच्या जोरावर हिंदी साहित्यमध्ये पीएचडी मिळवली. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानेही गौरविण्यात आले. 1959मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. 

Web Title: Celebrated Hindi author, literary critic Namvar Singh dies at 92.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.