कन्हैय्याचा प्रचार करुन स्वराच्या 31 व्या 'बर्थ डे'चं सेलिब्रेशन, उमेदवारी अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 02:14 PM2019-04-09T14:14:50+5:302019-04-09T14:17:08+5:30
अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा आज 31 वा वाढदिवस आहे.
बेगूसराय - भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे लोकसभा उमेदवार कन्हैय्या कुमार यांनी आज शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी घरातून निघताना आईचा आशीर्वाद घेऊन आणि दही साखर खाऊन कन्हैय्या यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी घर सोडले. कन्हैय्या यांच्या रॅलीत गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी सहभाग घेतला आहे. तर, अभिनेत्री स्वरा भास्कर हिने कन्हैय्या कुमारसाठी प्रचार करत आपल्या बर्थ डे सेलिब्रेशनला सुरुवात केली.
अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा आज 31 वा वाढदिवस आहे. आपल्या 31 व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना स्वराने ना मित्रांसोबत पार्टी केली, ना मैत्रीणींसोबत आऊटींगला गेली. स्वराने बेगुसराय मतदारसंघातील कम्युनिष्ट पक्षाचे उमेदवार कन्हैय्या कुमार यांच्या प्रचारार्थ रॅलीमध्ये सहभाग घेऊन आपल्या बर्थ डे सेलिब्रेशनला सुरुवात करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी स्वरासह तिचे जवळचे मित्रही बेगुसरायमध्ये दाखल झाले आहेत. तर जेएनयुमधील विद्यार्थी संघटनेचे नेते आणि विद्यार्थीही कन्हैय्याच्या प्रचारासाठी हजर झाले आहेत.
मला पार्टी करायला खूप आवडतं, पण आज मी दिवसभर फिरून कन्हैय्याचा प्रचार करणार आहे. त्यानंतर, प्रचार संपल्यानंतर रात्री माझ्या जवळच्या मित्रांसमवेत मी पार्टी करणार असल्याचेही स्वराने म्हटलं आहे.
दरम्यान, कन्हैय्याकुमार बेगूसराय मतदारसंघातून निवडणूक लढवत असून भाजपचे दिग्गज नेते गिरिराजसिंह यांचे कन्हैय्याला आव्हान असणार आहे. दरम्यान, कन्हैय्याकुमारने जनतेला आवाहन करुन आपल्या उमेदवारी आणि प्रचारासाठी निधी उभारला आहे.
अम्मा फ़ातिमा नफ़ीस, जिग्नेश, शेहला, गुरमेहर समेत उन तमाम साथियों का शुक्रिया जो संविधान और लोकतंत्र को बचाने के संघर्ष को मज़बूत करने के लिए बेगूसराय आए हैं। जहाँ देखो वहाँ हमारे साथी लाल झंडों के साथ नज़र आ रहे हैं। एकजुटता का ऐसा भव्य नज़ारा सबमें जोश भर रहा है। pic.twitter.com/0lkW4FAFF9
— Kanhaiya Kumar (@kanhaiyakumar) April 9, 2019