निष्पाप भारतीयांचे बळी घेणारा दहशतवादी हाफीज सईदच्या सुटकेचे उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 08:13 AM2017-11-25T08:13:49+5:302017-11-25T08:24:54+5:30

भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदची सुटका झाल्यामुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत असताना आपल्याच देशात सईदच्या सुटकेचे सेलिब्रेशन करण्यात आले.

Celebration of Hafiz Saeed, the victim of innocent Indians, celebrations in Lakhimpur, Uttar Pradesh | निष्पाप भारतीयांचे बळी घेणारा दहशतवादी हाफीज सईदच्या सुटकेचे उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये सेलिब्रेशन

निष्पाप भारतीयांचे बळी घेणारा दहशतवादी हाफीज सईदच्या सुटकेचे उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये सेलिब्रेशन

Next
ठळक मुद्देकाश्मीरचे स्वातंत्र्य हेच आपले लक्ष्य आहे.काश्मीर प्रश्नावरून लोकांची एकजूट करणार असल्याचे हाफिज सईद याने सुटकेनंतर सांगितले.सईद मोकाट सुटता कामा नये, त्याला अटक करण्याची जबाबदारी पाकिस्तान सरकारची आहे असे नॉरेट म्हणाल्या.

लखनऊ  - भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदची सुटका झाल्यामुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत असताना उत्तर प्रदेशातील लखीमपूर शहरात सईदच्या सुटकेचे सेलिब्रेशन करण्यात आले. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार लखीमपूरमधील शिवपुरी भागातील बेगम बाग कॉलनीत शुक्रवारी काही जणांनी सईदच्या सुटकेचे सेलिब्रेशन केले. जिल्हा न्यायदंडाधिकारी आकाशदीप यांच्या निदर्शनाला ही बाब आणून दिल्यानंतर तात्काळ पोलीस बेगम बाग कॉलनीत पोहोचले. 

बेगम बाग कॉलनीत रहाणा-या काही रहिवाश्यांनी हाफिज सईदची सुटका झाल्याच्या आनंदात घरावर हिरवे झेंडे लावले होते तसेच हाफिज सईद झिंदाबाद, पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. बेगम बागमधील 20 ते 25 युवक सईदच्या सुटकेचे सेलिब्रेशन करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. त्यावेळी घरांवर हिरवे झेंडे लावण्यता आले होते. आम्ही तात्काळ हे झेंडे काढून टाकले अशी माहिती कोटावली पोलीस स्थानकाचे प्रमुख प्रदीप शुक्ला यांनी दिली. 

आम्ही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहोत  असे त्यांनी सांगितले. जुलूस-इ-मोहम्मदीसाठी हे हिरवे झेंडे लावण्यात आले होते त्याचा सईच्या सुटकेशी काहीही संबंध नाही असे लखीमपूरमधील इमाम अशफाक कादरी यांनी सांगितले. 

काश्मीरचे स्वातंत्र्य हेच लक्ष्य, हाफिज सईदची दर्पोक्ती
काश्मीरचे स्वातंत्र्य हेच आपले लक्ष्य आहे.काश्मीर प्रश्नावरून लोकांची एकजूट करणार असल्याचे हाफिज सईद याने सुटकेनंतर सांगितले.सईदची सुटका म्हणजे २६ नोव्हेंबरच्या मुंबई अतिरेकी हल्ल्यातील आरोपींना न्यायाच्या चौकटीत आणण्याच्या भारताच्या प्रयत्नांना धक्का असल्याचे मानले जात आहे. अतिरेकी कारवायांत सहभाग असल्याच्या कारणावरून हाफिज सईदवर अमेरिकेने एक कोटी डॉलरचे बक्षीस घोषित केलेले आहे. हाफिज सईद हा या वर्षी जानेवारीपासून २९७ दिवस नजरकैदेत होता.
 

सईदच्या अटकेसाठी अमेरिकेचा पाकिस्तानवर दबाव
हाफीजची नजरकैदेतून सुटका झाल्याबद्दल अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. लष्कर-ए-तय्यबा ही सईदची दहशतवादी संघटना अमेरिकन नागरिकांसह शेकडो नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हिथर नॉरेट म्हणाल्या. सईद मोकाट सुटता कामा नये, त्याला अटक करण्याची जबाबदारी पाकिस्तान सरकारची आहे, असे नॉरेट म्हणाल्या.
 

Web Title: Celebration of Hafiz Saeed, the victim of innocent Indians, celebrations in Lakhimpur, Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.