बारावीची परिक्षा संपल्याचं सेलिब्रेशन, गाडीखाली चिरडून एकाचा मृत्यू
By admin | Published: April 20, 2017 11:06 AM2017-04-20T11:06:50+5:302017-04-20T11:06:50+5:30
बारावीची परिक्षा संपल्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी मित्रांसोबत गाडी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याने फुटपाथवर झोपलेल्यांच्या अंगावर गाडी घातली
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - बारावीची परिक्षा संपल्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी मित्रांसोबत गाडी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याने फुटपाथवर झोपलेल्यांच्या अंगावर गाडी घातली. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. आरोपी अल्पवयीन असून एका प्रतिष्ठित शाळेचा तो विद्यार्थी आहे. त्याच्याकडे आणि मित्राकडे दोघांकडेही चालक परवाना नसताना ते गाडी घेऊन घराबाहेर पडले होते. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.
दिल्लीमधील काश्मीरी गेट येथे असणा-या आयएसबीटी (Inter State Bus Terminal) येथे सकाळी 5.30 वाजता हा अपघात झाला. बारावीची परिक्षा संपल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आपल्या तिन मित्रांसोबत आरोपी बाहेर पडला होता. घटनास्थळावरुन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून दोघांना पळ काढला.
साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार हुंडाई आय 20 कारने सर्वजण प्रवास करत होते. बेदरकारपणे गाडी चालवत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि फूटपाथवर झोपलेल्या बेघर लोकांच्या अंगावर घातली.
Two dead & 3 injured after a car ran over them near Delhi's Kashmiri Gate. Class 12th student who was driving, apprehended by police. pic.twitter.com/kJ5VlgKdOz
— ANI (@ANI_news) April 20, 2017
"आरोपी अत्यंत भरधाव वेगात गाडी चालवत होते. तपास केला असता गाडी चालवणा-या विद्यार्थ्याकडे चालक परवाना नसल्याचं समोर आलं आहे", अशी माहिती पोलीस अधिकारी जतीन नारवल यांनी दिली आहे.