Punjab Assembly 2022: 'देसी घी'ची जिलबी...ढोल ताशे अन् भांगडा! 'आप'ची 'झाडू'न कामगिरी, पंजाबमध्ये जल्लोष; पाहा Video 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 11:22 AM2022-03-10T11:22:54+5:302022-03-10T11:23:44+5:30

Punjab Assembly 2022: पंजाब विधानसभा निवडणूक निकालात 'आम आदमी पक्षा'नं (आप) प्रस्थापितांना धक्का देत मोठं यश प्राप्त केलं आहे.

Celebrations at AAP CM candidate Bhagwant Manns residence in Sangrur as the party crosses the majority mark in Punjab | Punjab Assembly 2022: 'देसी घी'ची जिलबी...ढोल ताशे अन् भांगडा! 'आप'ची 'झाडू'न कामगिरी, पंजाबमध्ये जल्लोष; पाहा Video 

Punjab Assembly 2022: 'देसी घी'ची जिलबी...ढोल ताशे अन् भांगडा! 'आप'ची 'झाडू'न कामगिरी, पंजाबमध्ये जल्लोष; पाहा Video 

Next

Punjab Assembly 2022: पंजाब विधानसभा निवडणूक निकालात 'आम आदमी पक्षा'नं (आप) प्रस्थापितांना धक्का देत मोठं यश प्राप्त केलं आहे. पंजाबमध्ये एकूण ११७ जागांचे पहिले कल हाती आले असून 'आप'नं 'झाडू'न कामगिरी करत तब्बल ८९ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे पंजाबमध्ये आता सत्ताबदल पाहायला मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंतसिंग मान यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार जल्लोष केला जात आहे. 

'देसी घी'ची जलेबी...मिठाई, लस्सी अन् ढोल-ताशांवर भांगडा...असं जोरदार सेलिब्रेशन 'आप'च्या कार्यकर्त्यांतून केलं जात आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी, प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह अनेक दिग्गज नेते पिछाडीवर आहेत. तसंच शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल देखील पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. पंजाबमधील निवडणूक निकाल देशात सर्वात महत्वाचा निकाल समजला आहे. दिल्लीनंतर आम आदमीनं आता पंजाबमध्येही मतदारांना आकर्षित करण्यात यश प्राप्त केल्याचं पाहायला मिळत आहे. 

पंजाबचं सध्याचं पहिल्या कलानंतरचं चित्र-
एकूण जागा- ११७
बहुमताचा आकडा- ५९

आप- ८९
काँग्रेस- १४
भाजपा - ०३
अकाली दल- १०
अन्य- ०१

Web Title: Celebrations at AAP CM candidate Bhagwant Manns residence in Sangrur as the party crosses the majority mark in Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.