'पद्मावत' नंतर 'अय्यारी' सिनेमा वादात, सेन्सॉरने मंजुरी नाकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 03:22 PM2018-02-02T15:22:52+5:302018-02-02T15:28:24+5:30
करणी सेनेच्या विरोधामुळं पद्मावतच्या प्रदर्शनामध्ये अडथळे आले होते. त्याचा वाद शांत होतो ना होतो तोच आता अय्यारीचे प्रदर्शन थांबवलं आहे.
नवी दिल्ली - दिग्दर्शक निरज पांडे यांच्या अय्यारी चित्रपटावर संरक्षण मंत्रालयानं आक्षेप घेतल्यामुळं सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवलं आहे. करणी सेनेच्या विरोधामुळं पद्मावतच्या प्रदर्शनामध्ये अडथळे आले होते. त्याचा वाद शांत होतो ना होतो तोच आता अय्यारीचे प्रदर्शन थांबवलं आहे. अक्षय कुमारचा पॅडमॅन आणि अय्यारी एकाच दिवशी रिलीज होणार होते.
एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी, स्पेशल २६,बेबी यांसारख्या दमदार चित्रपटांचा दिग्दर्शक नीरज पांडेचा अय्यारी ९ फेब्रुवारी रोजीच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, रकुल प्रीत, मनोज वाजपेयी, अनुपम खेर आणि नसिरुद्दीन शाह यांच्या भूमिका आहेत. या सिनेमाची कथा दोन लष्करी अधिकाऱ्यांची आहे. ज्यांच्या काम करण्याच्या पद्धती पूर्ण वेगळ्या असतात. ही एका गुरू आणि शिष्य यांच्या खऱ्या आयुष्याची कथा आहे.
तर अक्षय-सिद्धार्थ आमने-सामने
‘अय्यारी’हा चित्रपट 26 जानेवारीला रिलीज होणार होता. पण ‘पद्मावत’ 25 जानेवारीला रिलीज होणार हे ठरले आणि ‘अय्यारी’चे दिग्दर्शक नीरज पांडे यांनी आपल्या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलत 9 फेबु्रवारी ही तारीख निवडली. ही तारीख निवडताना आपल्या चित्रपटासोबत दुसरा कुठलाही मोठा चित्रपट नसणार, ही अपेक्षा नीरज पांडे व टीमला होती. पण झाले भलतेच. ‘पद्मावत’ची रिलीज डेट येताच अक्षय कुमारनेही आपल्या ‘पॅडमॅन’ची रिलीज डेट लांबणीवर टाकत 9 फेबु्रवारी ही तारीख लॉक केली. म्हणजे आता ‘अय्यारी’ विरूद्ध ‘पॅडमॅन’ असा सामना बॉक्सऑफिसवर असणार आहे.