जिल्हा बँकेच्याविरोधात सेनेचा शिंगाडे मोर्चा कर्ज पुनर्गगठन प्रश्नी गुलाबरावांची खडसेंवर टीका

By Admin | Published: May 14, 2016 12:02 AM2016-05-14T00:02:49+5:302016-05-14T00:02:49+5:30

जळगाव : शेतकर्‍यांच्या पीक कर्जाच्या पुनर्गठनाबाबत जिल्हा बँकेकडून होणार्‍या टाळाटाळला शिवसेनेने शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढून जोरदार उत्तर दिले. यावेळी शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर टिकास्त्र सोडत पीक कर्जाचे पुनर्गठन न केल्यास शेतकरी आत्महत्येचा इशारा दिला.

Censorship Against District Bank, Shingade Front Debt Restructuring Question, Writes Gulabarawwati | जिल्हा बँकेच्याविरोधात सेनेचा शिंगाडे मोर्चा कर्ज पुनर्गगठन प्रश्नी गुलाबरावांची खडसेंवर टीका

जिल्हा बँकेच्याविरोधात सेनेचा शिंगाडे मोर्चा कर्ज पुनर्गगठन प्रश्नी गुलाबरावांची खडसेंवर टीका

googlenewsNext
गाव : शेतकर्‍यांच्या पीक कर्जाच्या पुनर्गठनाबाबत जिल्हा बँकेकडून होणार्‍या टाळाटाळला शिवसेनेने शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढून जोरदार उत्तर दिले. यावेळी शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर टिकास्त्र सोडत पीक कर्जाचे पुनर्गठन न केल्यास शेतकरी आत्महत्येचा इशारा दिला.
गेल्या काही महिन्यांपासून महसूलमंत्री एकनाथराव खडसे व शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांच्यात जिल्हा बँकेच्या कर्ज वितरण प्रकरणी राजकीय वाद सुरू आहे. याप्रकरणी आमदार गुलाबराव पाटील यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल आहे. काही वर्षांपूर्वी धरणगाव तालुक्यात टिश्यू कल्चर केळीसाठी दिलेल्या कर्जाचा दुरुपयोग झाल्याप्रकरणी जिल्हा बँकेने धरणगाव तालुक्यातील ५१ विकासोची चौकशी सुरु केली आहे. आमदार गुलाबराव पाटील यांनीदेखील हे कर्ज घेतल्याप्रकरणी जिल्हा बँकेने त्यांच्या कर्जाचे कागदपत्रे मागविले आहेत. याप्रकरणी खडसेंच्या दबावतंत्राला उत्तर म्हणून शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शहर दणाणून सोडले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर तेथे झालेल्या सभेत आमदार गुलाबराव पाटील यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या टिकेचा संपूर्ण रोख हा महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर होता. शेतकर्‍यांच्या कर्ज पुनर्गठनाबाबत तसेच पीक कर्जाबाबत खडसे कसा अन्याय करीत आहेत, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जि.प. सीईओंवरही आगपाखड केली.

जिल्हा बँकेच्या चेअरमन या खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर आहेत. सत्तेत भाजपा-सेना असतानाही शिवसेनेने शिंगाडे मोर्चा काढून शेतकर्‍यांच्या प्रश्नावर मोर्चा काढून नागरिकांचे व प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले, हे विशेष.

चौकट
प्रत्येक गावातून पाच शेतकरी आत्महत्या
शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठन तसेच अन्य मागण्यांबाबत १५ दिवसांत निर्णय न झाल्यास प्रत्येक गावातून पाच शेतकरी आत्महत्या करणार असल्याचा इशारा गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना निवेदन देताना दिला. कर्ज पुनर्गठनासंदर्भात सोमवारी बैठक घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह शेतकर्‍यांना दिले.

Web Title: Censorship Against District Bank, Shingade Front Debt Restructuring Question, Writes Gulabarawwati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.