केंद्रानं 100 टक्के एफडीआयसाठी संरक्षण व नागरी विमान वाहतूक क्षेत्रं केली खुली
By admin | Published: June 20, 2016 04:05 PM2016-06-20T16:05:50+5:302016-06-20T16:19:27+5:30
केंद्र सरकारनं संरक्षण आणि नागरी विमान वाहतूक या क्षेत्रांत 100 टक्के परदेशी गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - आर्थिक सुधारणांवर भर देत मोदी सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. केंद्रातल्या मोदी सरकारनं संरक्षण आणि नागरी विमान वाहतूक या क्षेत्रांत 100 टक्के परदेशी गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रात परदेशी उद्योजकांना सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इतर क्षेत्र म्हणजेच फूड, ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस, प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सींना परदेशी गुंतवणुकीसाठी सूट देण्यात आली आहे. स्वयंचलित मार्ग आणि इतर क्षेत्रही परदेशी गुंतवणुकीसाठी खुली केल्याची माहिती यावेळी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. भारतातील रोजगार आणि रोजगार निर्मिती प्रमुख क्षेत्रांना उत्तेजन देण्यासाठी उदारीकरणासाठी व्यापक धोरण अवलंबण्याचाही सरकार विचार करत असून, ही क्षेत्रही थेट परदेशी गुंतवणुकीसाठी खुली करण्याचा केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. नागरी उड्डाण वाहतूक, विमा, ई- कॉमर्स, पेन्शन, फार्मास्युटिकल ही क्षेत्रही 100 टक्के खुली केल्यानं या क्षेत्रातही थेट परदेशी गुंतवणूक करता येणार आहे.
परदेशी गुंतवणुकीसाठी भारतीय अर्थव्यवस्था सर्वात खुली अर्थव्यवस्था- नरेंद्र मोदी
भारत ही आशियातील तिस-या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून, आम्ही ही अर्थव्यवस्था 100 टक्के परदेशी गुंतवणुकीसाठी खुली केल्याची माहिती मोदींच्या पंतप्रधान कार्यालयानं टि्वट करून दिली आहे.
It has now been decided to permit 100% FDI under government approval route for trading, including through e-commerce (1/2)
— PMO India (@PMOIndia) June 20, 2016