केंद्राची सट्टेबाजांवर कारवाई; महादेव अॅपसह २२ बेकायदेशीर अॅप्स, वेबसाईट ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 11:15 PM2023-11-05T23:15:28+5:302023-11-05T23:15:51+5:30
ईडीच्या विनंतीवरून मंत्रालयाने महादेव अॅपसह २२ अॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक केल्या आहेत.
नवी दिल्ली – माहिती तंत्रज्ञान आणि प्रसारण मंत्रालयाने महादेव अॅपसह २२ बेकायदेशीर बेटिंग अॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे आदेश जारी केले आहेत. बेकायदेशीर सट्टेबाजी अॅप सिंडिकेटच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या तपासानंतर आणि छत्तीसगडमधील महादेव बुकवर त्यानंतरच्या छाप्यानंतर ही कारवाई करण्यात आली, ज्याने अॅपचे बेकायदेशीर ऑपरेशन उघड केले आहे. महादेव बुकचा मालक सध्या कोठडीत आहे, त्याला मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMLA) कलम १९ अंतर्गत मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली आहे, जी PMLA, २००२ च्या कलम ४ अंतर्गत दंडनीय आहे.
केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की, "छत्तीसगड सरकारला आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत वेबसाइट/अॅप बंद करण्याची शिफारस करण्याचा पूर्ण अधिकार होता. गेल्या दीड वर्षांपासून त्याची चौकशी सुरू आहे. खरं तर, ईडीकडून ही पहिली विनंती करण्यात आली असून त्यावरून पुढील कारवाई केली गेली.
२२ बेकायदेशीर अॅप्स-वेबसाइट्स ब्लॉक
ईडीच्या विनंतीवरून मंत्रालयाने महादेव अॅपसह २२ अॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक केल्या आहेत. छत्तीसगड सरकारला आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत वेबसाइट बंद करण्याची शिफारस करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्हाला ईडीकडून शिफारस मिळाल्यानंतर ही ब्लॉकची कारवाई करण्यात आली आहे असं राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले.
Centre issues blocking orders against 22 'illegal' betting apps, including Mahadev Book app
— ANI Digital (@ani_digital) November 5, 2023
Read @ANI Story | https://t.co/7OI1DbGZsa#illegalbettingapps#MahadevBookapp#BhupeshBaghelpic.twitter.com/KloZjIXEf4
काही महिन्यांतच देशभरातील १२ लाखांहून अधिक लोक महादेव बुक नावाच्या या अॅपमध्ये सामील झाले होते आणि याद्वारे लोकांनी क्रिकेटपासून निवडणुकीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर सट्टा लावण्यासाठी या अॅपचा वापर करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर कोरोना महामारीनंतर या अॅपचा व्यवसाय खूप वेगाने वाढला.